Agripedia

मित्रांनो तुम्ही सुरण खाल्लं आहे का? सुरण खायला खूपचं स्वादिष्ट असते याशिवाय यामध्ये असलेले औषधी गुणधर्म आरोग्यास खुप फायदेशीर ठरत असते. शेतकरी बांधवांसाठी देखील सुरण फायदेशीर ठरू शकते. सुरण लागवड करून शेतकरी बांधव त्यांचे उत्पन्न नक्कीच वाढवू शकतात कारण याची बाजारात किंमत कधीच कमी होत नाही.

Updated on 10 April, 2022 6:54 PM IST

मित्रांनो तुम्ही सुरण खाल्लं आहे का? सुरण खायला खूपचं स्वादिष्ट असते याशिवाय यामध्ये असलेले औषधी गुणधर्म आरोग्यास खुप फायदेशीर ठरत असते. शेतकरी बांधवांसाठी देखील सुरण फायदेशीर ठरू शकते. सुरण लागवड करून शेतकरी बांधव त्यांचे उत्पन्न नक्कीच वाढवू शकतात कारण याची बाजारात किंमत कधीच कमी होत नाही.

तसेच त्याची शेल्फ लाइफ जास्त असल्याने हिरव्या भाज्यांप्रमाणे घाईगडबडीत विकण्याचा त्रास नाही. यामुळेच शेतकऱ्यांना त्याची लागवड करायला विशेष पसंत आहे. आज आपण सुरनच्या लागवडीचा उल्लेख करत आहोत कारण हीच त्याची लागवड करण्याची योग्य वेळ आहे. ज्या शेतकऱ्यांना सुरणची लागवड करायची आहे त्यांनी आता या चालू हंगामात याची लागवड करावी.

सुरण एक कंदवर्गीय पीक आहे. हे जमिनीच्या आत तयार होतं असते. म्हणूनच सुरणचं बियाणे म्हणून वापरले जाते. शेतकरी बांधवांनो जर आपणास सुरण लागवड करायची असते तर पुनर्लागवड करण्यासाठी सर्वप्रथम शेताची मशागत करावी लागणार आहे.

शेत तयार करण्यासाठी सर्व्यात आधी शेताची खोल नांगरणी करावी लागेल जेणेकरून शेतातील हानिकारक जीवाणू आणि विषाणू नष्ट होतील. नंतर शेत थोडे कोरडे पडल्यावर रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करावी लागणार आहे. अशा प्रकारे पूर्वमशागत पार पाडून शेत तयार करावे लागणार आहे. याच्या लागवडीसाठी वालुकामय व चिकणमाती असलेली जमीन योग्य मानली जाते. शेतात अंतिम नांगरणी करताना हेक्टरी 12 टन शेणखत टाकून पाटा चालवावा किंवा फळी मारून जमीन समतल करावी.

सुरण या पिकाच्या चांगल्या वाणांची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणुन शेतकरी बांधवांनी सुरणाचे संत्रागच्छी, कोऊ, श्री पद्या, श्री अधिरा, बिदानकुसूम, पालम’झिमिखंड-१ आणि गजेंद्र हे वाण लावावे असा सल्ला दिला जातो.  या वाणापासून हेक्‍टरी सर्वसाधारण १२ ते २२ टन मिळते उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

English Summary: Farming Business Idea: Plant Suran and Earn Good Profits; Read about it
Published on: 10 April 2022, 06:54 IST