शेती व्यवसायात अधिक उत्पन्न कमवायचे असेल तर शेतकरी मित्रांनो आपणांस जरा हटके विचार करावा लागणार आहे. पारंपरिक शेतीच्या पद्धतीत आता बदल करावा लागणार आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील आता शेतकरी बांधवाना पीक पद्धत्तीत बदल करण्याचा सल्ला देत आहेत.
कृषी तज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी आता नगदी पिकांची लागवड केली पाहिजे. नगदी पिकांची लागवड केली तर निश्चितचं शेतकऱ्यांनां फायदा मिळणार आहे. यामुळे आज आपण किन्नू या पिकाच्या शेतीविषयी जाणुन घेणार आहोत.
किन्नू हे एक फळ पीक आहे. विशेष म्हणजे या फळपिकाची लागवड कोणत्याही जमिनीत आणि कोणत्याही हवामानात केली जाऊ शकते. मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, किन्नूमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, यामुळे मानवी आरोग्याला या फळाचे सेवन अधिक फायदेशीर ठरते.
याचे सेवन केल्याने मानवी शरीरात रक्त वाढते आणि हाडे मजबूत होतात. मित्रांनो भारतात पूर्वी पंजाब, हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये किन्नूची प्रामुख्याने लागवड केली जात होती, अलीकडे मात्र याची लागवड यूपी सारख्या इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाऊ लागली आहे.
खरं पाहता किन्नू हे पंजाबचे मुख्य फळ पीक आहे. मात्र असे असले तरी संपूर्ण उत्तर भारतात किन्नूची लागवड केली जाते. केळी आणि आंब्यानंतर सायट्रस अर्थात लिंबूवर्गीय पिके हे भारतातील तिसरे मोठे फळ पीक आहे.
किन्नूची लागवड 13 अंश ते 37 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या हवामानात करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय याची लागवड 300-400 मिमी पाऊस पडतो अशा ठिकाणी करावी असे सांगितले जाते. किन्नू पिकाच्या काढणीच्या वेळी तापमान 20-32 अंश सेल्सिअस दरम्यान असावे. जेणेकरून या पिकापासून चांगले उत्पादन मिळवले जाऊ शकते.
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला किन्नूची या लिंबू वर्गीय पिकांची लागवड करायची असेल तर तुम्हाला एका एकरात किमान 111 किन्नूच्या रोपांची आवश्यकता भासणार आहे. किन्नू रोपाची लागवड करताना योग्य अंतर ठेवणे आवश्यक असणार आहे.
जाणकार लोकांच्या मते किन्नूच्या दोन झाडांमध्ये 6 × 6 मीटर अंतर असणे अत्यंत आवश्यक आहे. किन्नू पिकाच्या चांगल्या वाढीसाठी या पिकाला सतत पाणी द्यावे लागते. 3-4 वर्षांच्या झाडांना आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे लागणार आहे. जुन्या झाडांना जमिनीचा प्रकार, हवामान आणि पर्जन्यमानानुसार 2-3 आठवड्यांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. या पिकाला अधिकचे पाणी देणे चुकीचे असते कारण त्यामुळे मुळे कुजणे, कॉलर रोट इ. रोग झाडांना लागण्याची दाट शक्यता असते.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत किन्नू पीकाची काढणी करावी असा सल्ला दिला जातो. किन्नूची फळे झाडावरून तोडण्यासाठी काठीची आवश्यकता भासते. याशिवाय या झाडाची फळे कात्रीच्या साहाय्याने तोडले जाऊ शकतात.
फक्त फळे काढणीच्या वेळी किन्नूचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी किन्नूचे पीक भारतात कोणत्याही बाजारपेठेत विकू शकतात, मात्र असे असले तरी याची फळे बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, पंजाब इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकले जातात. याशिवाय या फळाची श्रीलंका, सौदी अरेबिया इत्यादी अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.
Published on: 26 April 2022, 09:14 IST