Agripedia

Pineapple Farming : अननस खाण्याचे अनेक फायदे आहेत. भूक वाढवण्यासाठी आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. त्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो. सध्या फारच कमी लोक अननसाची लागवड करतात, यामुळे या संधीचे सोने करून आपण या पिकाच्या लागवडीतून चांगला नफा कमवू शकता. अनेक राज्यांमध्ये 12 महिने अननसाची लागवड (Pineapple Cultivation) केली जाते.

Updated on 05 May, 2022 4:22 PM IST

Pineapple Farming : अननस खाण्याचे अनेक फायदे आहेत. भूक वाढवण्यासाठी आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. त्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो. सध्या फारच कमी लोक अननसाची लागवड करतात, यामुळे या संधीचे सोने करून आपण या पिकाच्या लागवडीतून चांगला नफा कमवू शकता. अनेक राज्यांमध्ये 12 महिने अननसाची लागवड (Pineapple Cultivation) केली जाते.

अननस लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अननस लागवड वर्षातून कोणत्याही हंगामात करता येते. इतर पिकांच्या तुलनेत अननसात नफा मिळविण्याच्या (Farmer Income) चांगल्या संधी आहेत. अननस हा उष्ण हवामानाचा क्षण मानला जातो. मात्र, वर्षभर त्याची लागवड करता येते.

अननस ही एक कॅक्टस प्रजाती (Cactus species) आहे. त्याची देखभाल करणे देखील खूप सोपे आहे. यासोबतच हवामानाची फारशी काळजी घेण्याची गरज नाही. केरळसारख्या अनेक राज्यांमध्ये शेतकरी 12 महिने या पिकांची लागवड करतात.

याच्या झाडांना इतर झाडांच्या तुलनेत कमी पाणी लागते. पेरणीपासून फळे पिकण्यापर्यंत 18 ते 20 महिन्याचा कालावधी लागतो. फळ पिकल्यावर त्याचा रंग लाल-पिवळा होऊ लागतो. त्यानंतर त्याच्या काढणीचे काम सुरू होते.

किती होईल कमाई 

अननसाच्या झाडांना एकदाच फळ येते. म्हणजेच अननस पिकातून फक्त एकदाच उत्पादन घेता येऊ शकते. यानंतर मग दुसऱ्या लॉटसाठी पुन्हा पीक घ्यावं लागतं. अननस अनेक रोगांसाठी रामबाण असल्याचा दावा केला जातो.

त्यामुळे बाजारात त्याची मागणी जास्त असते. अननस बाजारात सुमारे 150 ते 200 रुपये किलो दराने विकले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांनी हेक्टरी 30 टन अननसाचे उत्पादन घेतले तर लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या:

Cucumber Farming; काकडी लागवड करा आणि हमखास नफा मिळवा वाचा याविषयी सविस्तर

Watermelon Damage : एका क्षणात झालं होत्याचं नव्हतं; कलिंगडला दर कमी त्यात हे विपरीत घडलं, उत्पादकाला लाखोंचा फटका

English Summary: Farming Business Idea: cultivate over a year this fruit and earn a lot of money; Read more about it
Published on: 01 May 2022, 02:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)