Agripedia

मित्रांनो सध्या जगात औषधी वनस्पतींची मोठी मागणी आहे. औषधी वनस्पतींची शेती आपल्या देशात अनेक दशकांपासून सुरू आहे. यातून शेतकरी चांगला नफाही कमावतात, कारण त्यांचा वापर अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो आणि मागणी नेहमीच असते. असेच एक पीक आहे मेंथा, ज्याची लागवड करून शेतकरी भरपूर नफा कमावत आहेत.

Updated on 05 May, 2022 6:08 PM IST

मित्रांनो सध्या जगात औषधी वनस्पतींची मोठी मागणी आहे. औषधी वनस्पतींची शेती आपल्या देशात अनेक दशकांपासून सुरू आहे. यातून शेतकरी चांगला नफाही कमावतात, कारण त्यांचा वापर अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो आणि मागणी नेहमीच असते. असेच एक पीक आहे मेंथा, ज्याची लागवड करून शेतकरी भरपूर नफा कमावत आहेत.

मेंथाची शेती संपूर्ण देशात केली जाते, परंतु प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि पंजाबमधील शेतकरी मेंथाची लागवड करतात. आपल्या राज्यात देखील या पिकाची थोड्याफार प्रमाणात का होईना शेती बघायला मिळते. संपूर्ण जगात मेंथापासून मिळणाऱ्या मेंथा तेलाचा वापर सुमारे ९५०० मेट्रिक टन आहे. याच्या उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या:

Onion Farming : उन्हाळ्यात कांदा पिकाचे व्यवस्थापण; वाचा या महत्वपूर्ण माहितीविषयी

भले शाब्बास पोरी! शेतकरी बापाचा शेतात उभारला पुतळा; या लेकीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ऐरोमेटीक प्लांट्स मेंथा लागवडीवर सातत्याने संशोधन करत आहे. मेंथाच्या चांगल्या उत्पादनासाठी वालुकामय चिकणमाती असलेली शेतजमीन योग्य मानली जाते. तसेच, पाण्याचा निचरा होणारी चांगली भुसभुशीत माती असलेली जमीन याच्या शेतीसाठी योग्य मानली जाते. मेंथाच्या वाढीसाठी पावसाळा चांगला मानला जातो. मेंथा लावण्यापूर्वी शेताची खोल नांगरणी करावी लागते. शेवटच्या नांगरणीच्या वेळी शेणखत टाकल्यास चांगले उत्पादन मिळते.

मेंथा तेलाचा वापर औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये तसेच सुगंधासाठी केला जातो. एक हेक्टरमध्ये लागवड केलेल्या मेंथा पिकातून 150 किलो तेल मिळत असल्याचे सांगितलं जाते. मेंथाची लागवड वेळीच केल्यास तसेच योग्य सिंचन आणि खतांचा वापर केल्यास तेल उत्पादन 250 ते 300 किलोपर्यंत पोहोचू शकते.

मेंथा तेल प्रति लिटर 1000 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात असते. अशाप्रकारे चांगले उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांना एक हेक्टरपासून तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. एका हंगामातील इतर कोणत्याही पिकाच्या कमाईपेक्षा हे अनेक पटींनी जास्त आहे.

मेंथापासून तेल काढण्यासाठी कापणीनंतर मेंथा पसरवा. त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि काही प्रमाणात वजन कमी होते. यानंतर ते डिस्टिलेशन प्लांटमध्ये भरून गरम केले जाते. या प्रक्रियेदरम्यान मेंथातून तेल बाहेर येते. उर्वरित अवशेष खत म्हणून वापरले जाऊ शकते.

शेतकर्‍यांना पीक काढणी करण्यापूर्वी 15 दिवस आधी पाणी न देण्याचा सल्ला दिला जातो. कीड आणि रोगांचे नियंत्रण करण्यासाठी शेताचे वेळोवेळी निरीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. मेंथा पीक 100 ते 110 दिवसात तयार होते. यामुळे शेतकरी कमी वेळेत चांगला नफा कमवू शकतात.

English Summary: Farming Business: Farmer friends can cultivate this medicinal plant for you; Read about it
Published on: 04 May 2022, 10:35 IST