Agripedia

शेती विषयक माहिती समजुन सांगणारे कृषी विज्ञान केंद्र आज शेतकर्याच्या गळ्यातले ताईत बनले

Updated on 12 April, 2022 10:22 AM IST

शेती विषयक माहिती समजुन सांगणारे कृषी विज्ञान केंद्र आज शेतकर्याच्या गळ्यातले ताईत बनले आहे मला सांगतात खुप आनंद होतो की शेतीच्या बाबतीत आमचे के व्ही के घातखेड अग्रगण्य संस्था आहे ज्याप्रमाणे लोकांना निरोगी ठेवण्यासाठी आणि आवश्यक आरोग्य सल्ला देण्यासाठी दवाखाना व डॉक्टर असतातना त्याचप्रमाणे आमच्या कृषी विज्ञान केंद्रातील शेतकऱ्यांच्या सर्वच समस्या सोडवण्यासाठी आणि पिकांवरील रोगांवर उपचार करण्याचे काम तज्ञ मंडळी करतात.तसेच माझे गुरू श्री प्रमोद जी मेंढे सर हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक वेळेस हजर जवाबी असतात. वेबीनार,शेतीशाळा किंवा कृषी विस्तार कार्यक्रम आयोजित करण्याच जणु काही विळाच उचलला आहे 

जिथे शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मेंढे सर उपस्थित असतात.

आधुनिक कृषी तंत्रज्ञान असो की पारंपरिक ज्ञान कौशल्ये विकसित करण्यासाठी शेतकर्यां मधे क्षमता वाढविण्याचे प्रयत्न करत आहे शेती क्षेत्रातील उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व आणि संसाधन केंद्र म्हणून काम करण्यास आमचे के व्ही के घातखेड प्रतिबद्ध आहे तसेच शेतकऱ्यांना या पीक चे संवर्धन करून कृषी सल्ला देण्यासोबतच दर्जेदार तंत्रज्ञानाची निर्मिती आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते.आमचे मेंढे सर विस्तार च काम चोखपणे राबविण्यात

तसेच वेबिनार आयोजित करण्याबरोबरच के व्ही के च्या नविन संकल्पना शेतकरी ला पोचविण्यात मदत करतात व नविन काही करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.तसेच के व्ही के घातखेड यांच्या दिल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत आणि खेड्यापाड्यापर्यंत तसेच आमच्या धारणीमधला बहूल भागात असलेल्या शेतकर्या पर्यंत आपले के व्ही के पोचले आहे. तसेच तज्ञाच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी पारंपरिक शेती सोडून विज्ञानाकडे वाटचाल करत आहेत.नवं शेतकरी, तरुण-तरुणी इत्यादींना फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम उत्पादन याकडे वळवले आहे.आता शेतकरीही सेंद्रिय शेतीकडे रस दाखवत आहेत.

ज्या भागात आमच्या के व्ही के घातखेड ने काम केले आहे त्या शेतकऱ्यांना तेथे शेतीमध्ये खुप फायदा झाला आहे. आज ज्या शेतकर्याने प्रशिक्षित घेतलं आहे तो शेतकरी शेतकऱ्यांपर्यंत कृषी ज्ञानाचा प्रसार करत आहे हे निदर्शनास आले यामुळेच के व्ही के घातखेड शेतकऱ्यांना शेतीचे नवीन तांत्रिक आणि वैज्ञानिक ज्ञान देऊन कृषी उत्पादकता अनेक पटींनी वाढविण्यात मदत कशी होईल हे या परीनं काम करत आहे.केव्हीकेने दिलेले कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अधिक सक्षम बनवता येते. त्यासाठी काही धोरण आखण्याची गरज आहे.अधिक गतिशीलतेने शेतकऱ्यांची सेवा करू शकतील अशी मला खात्री आहे. धन्यवाद के व्ही के घातखेड

 

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

मिलिंद जि गोदे

ध्येय मातीला वाचवणं

Save the soil all together

9423361185

English Summary: Farming and kvk guidance know about more intelligent can you
Published on: 12 April 2022, 10:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)