Agripedia

तुम्हाला माहिती असेल, नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास

Updated on 11 September, 2022 3:36 PM IST

तुम्हाला माहिती असेल, नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.सध्या राज्यात जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हंणून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी

काल गुरुवारी 3 हजार 501 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.3 thousand 501 crore assistance has been announced yesterday Thursday.

हे ही वाचा - वस्त्रोद्योग कंपन्या, व्यापारी, सटोडियांच्या हितासाठी निर्णय; शेतकरी संघटनांकडून कापूस भावासाठी तीव्र नाराजी

पहा काय म्हणाले कृषिमंत्री ?राज्यातील ज्या कृषी मंडळामध्ये 24 तासात 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला असेल आणि ज्या मंडळातील गावामध्ये 33 टक्क्यांपेक्षा जास्त

शेतीचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार आहे.केव्हा मिळणार मदत ? - येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरूवात होईल, ही मदत तीन टप्प्यात मिळेल, असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

यामध्ये 3 हेक्टरच्या मर्यादित जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13,600 प्रती हेक्टर देण्यात येणार आहे - तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत 27 हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येईल.येत्या 2 ते 3 दिवसांत - शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार - ही माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

English Summary: Farmers will get compensation on 'this' day - big announcement of state government
Published on: 11 September 2022, 10:39 IST