Agripedia

शेतकरी शेतीमध्ये वेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करताना दिसतात.

Updated on 25 November, 2021 7:43 PM IST

इफको या कंपनीने आजपर्यंत अनेक दर्जेदार रासायनिक खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केलेला आहे.

अशातच शेतकऱ्यांच्या सेवार्थ इफकोनेसागरिका नावाचे सेंद्रिय खत तयार केले आहे. 

नेमके काय आहे सागरिका सेंद्रिय खत?

इफकोने असे सेंद्रिय खत तयार केले आहे,यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादनआणि मातीचे गुणवत्ता दोन्ही वाढवता येतील व टिकवताहीयेतील. सागरिका सेंद्रिय खते समुद्री शैवाल पासून तयार केले जाते. म्हणून त्याला सागरिका असे नाव देण्यात आले आहे.

अशा पद्धतीने करू शकता वापर

२५० मिली द्रव्य सागरिका सेंद्रिय खत एक लिटर पाण्यात विरघळवून तुम्ही संपूर्ण एक एकर शेतात फवारणी करू शकतात.तसेच घन स्वरूपात असलेल्या सागरिका सेंद्रिय खताचा वापर तुम्ही एक एकर जमिनीसाठी आठ किलो पर्यंत घेऊन त्याचा वापर करू शकता.

 

कंदवर्गीय भाजीपाला पिकासाठी उपयुक्त

शेतकऱ्यांनी जर सागरिका सेंद्रिय खताची फवारणी भाजीपाला वर्गीय पिकावर केली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.

कांदा, बटाटा आणि लसूण सारख्या कंदवर्गीय भाज्यांसाठी या सेंद्रिय खताचा वापर करून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात. शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर आहेत.

 

सेंद्रिय खताची किंमत

इफको या कंपनीने दोन वर्ष संशोधन करून सागरिका तयार केले आहे. यामध्ये विशेष असे की सागरिका आहे १०० टक्के सेंद्रिय खत आहे.

कंपनीने सागरिका हे द्रव्य आणि घण अशा दोन्ही स्वरूपात मार्केटमध्ये आणले आहे.

कंपनी नुसार एक लिटर द्रव्य बाटलीची किंमत पाचशे रुपये आहे आणि घन स्वरूपात दहा किलो सेंद्रिय खताची किंमत ४१५ रुपये आहे.

English Summary: Farmers will benefit from this organic fertilizer of IFFCO!
Published on: 25 November 2021, 07:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)