Agripedia

आज मुलीच्या पालकांची जरी इच्छा असली सरकारी नोकरी पाहिजे सरकारी नोकरीं बघुन मुलगी देत असाल तर पुढच्या पिडीला भीक मागायची वेळ

Updated on 25 February, 2022 5:01 PM IST

आज मुलीच्या पालकांची जरी इच्छा असली सरकारी नोकरी पाहिजे सरकारी नोकरीं बघुन मुलगी देत असाल तर पुढच्या पिडीला भीक मागायची वेळ येईल.मुलाला पण आजच सरकारी नोकरी शंभर मुलांना पैकी फक्त पाच मुलं सरकारी नोकरी ला आहे, आज तरी पाच मुलांना सरकारी नोकरी आहे पण अजून येत्या पाच वर्षा नंतर सरकारी नोकरी ही एकाही मुलाला मिळणार नाही आजच सत्तर टक्के खाजगीकरण झाले आहे आणि सरकारने सरकारी क्षेत्राचे खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे येत्या दहा वर्षात सर्व 95 टक्के खाजगीकरण होईल हे कटू सत्य आहे. फक्त पोलीस व आर्मी खाते सरकारी राहील त्यात पण कमालीचा बदल होईल ज्या ठिकाणी पन्नास पोलीस काम करता तेथ फक्त पाच पोलीस लागतील याला कारण विज्ञान आहे आज पन्नास टक्के लोकं CCTV कॅमेऱ्यात बंदिस्त आहे, परिणामी माणुष्यबळ कमी लागते. सिगनल वर पोलीस उभे राहायचे तिथे कॅमेरा असेल, म्हणजे आज पोलीस भरती पाच वर्षात पाच हजार जागा निघतात त्या पुढिल दहा वर्षात तेवढ्या दोन हजार निघतील एक मुलगा भरती झाल्यानंतर वयाच्या साठ वर्षा पर्यंत काम करतो. परिणाम सरकारी नोकरी हि 98 % हद्द पार होईल. नोकरींवाला शेती विकत घेऊ शकत नाही हे कटू सत्य आहे उलट शहरात घर घेण्यासाठी गावाकडील शेती विकून टाकतो. परिणामी भूमिहीन होतो. पुढे त्यांना जे मुलं होतील त्यांना सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी भेटणार नाही मग त्या मुलांना रस्त्यावर भीक मागायची वेळ येईल. शेती हा उत्तम व्यवसाय आहे

पिढ्यान पिढ्या टिकणारा व्यवसाय आहे म्हूणन शेतकरी मुलाची निवड करा 

             खाजगी क्षेत्रातील नोकरी खाजगी नोकरी हि बिनबुडाची नोकरी आहे, आज आहे उद्या नाही पगार कमी व रुबाब जास्त ऐकवा लागतो अशी हि बिनबुडाची नोकरीं, पॅकज असते त्यांना तीन लाख, पाच लाख, सात लाख, हे वार्षिक पॅकेज त्यात रूम भाडे, लाईट बिल, पाणीपट्टी, गॅस टाकी, पेट्रोल, मोबाईल रिचार्ज, टीव्ही चा रिचार्ज, बयूटीपार्लर, सर्व खर्चची बेरीज केली तर महिन्याला कमीत कमी वीस हजार खर्च होतो. आज इंजिनिअर ला पंधरा, वीस हजार पगार आहे पाच हजार पगार वाढ होण्यासाठी पाच वर्ष लागत्यात. आज आज प्रेत्येक गावात पन्नास मुले इंजिनिअर आहे, त्या मुळे बरेच इंजिनिअर मुलं गावात कट्यावर बसले दिसतात,कोणतीही खाजगी कंपनी मध्ये तीन हजार पेक्षा जास्त कामगार नाही आजच्या स्थिती मध्ये भविष्यात वाढत्या यांत्रिकीकरणामुळे ज्या ठिकाणी वीस लोकं काम करताय तिथे फक्त दोन लोकं काम करणार खाजगी क्षेत्रात टार्गेट नावाची एक स्पर्धा सुरु झाली त्यात दिवसाचे, महिन्याचे, वर्षाचे टार्गेट दिलेले असते ते टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात स्व:ताची फॅमिली ला वेळ देऊ शकत नाही, नातेवाईकाच्या सुख- दुःखात सभागी होऊ शकत नाही, ऐवढे करून पण टार्गेट पूर्ण होत नाही परिणामी पगार वाढ होत नाही प्रमोशन होत नाही बॉस चे बोलणे ऐकावे लागते आणि तो राग घरी आल्यावर पत्नी वर काढतो त्याचा परिणाम म्हणून घटस्फोटचे प्रमाण वाढलेले आपल्या दिसून येत आहे,हि नोकरी पीडिजात नाही, पुढे येण्याऱ्या काही वर्षनी इंजिनिअर मुलांना शर्टींग करून भीक मागायची वेळ येईल कारण कोणतीच कंपनी गेट वर सुद्धा उभी करणार नाही.कोणत्याच कंपनी मध्ये कामगार वाढवत नाही उलट कामगार कपात सुरु आहे.पुढे खुप वाईट दिवस खाजगी क्षेत्रातील लोकांवर येतील.

व्यवसाय बेरेच लोकं व्यवसाय कडे वळत आहे पण कोरोना सारख्या भयकर आजारात व्यवसायचे काय हाल झाले ते आपण बघितले, जे निवळ व्यवसायावर अवलंबून आहे त्यांचे खायचे वांदे झाले होते, व्यवसाय हा दहा वर्षात नामशेस होईल त्याचे भविष्य मी आपल्या समोर ठेवतो,पहिले गावात दोन दुकान होते आता गल्लीत पाच दुकान आहे परिणामी ग्राहक कमी झाले, पेट्रोल पंप पंचवीस किलोमीटर होता पहिले दहा वर्षापूर्वी आता पाच किलोमीटर वर आहे भविष्यात एक किलोमीटर राहील. रसाचे दुकान प्रत्येक लिंबाच्या झाडाखाली आहे, कापड दुकान, मोबाईल दुकान कुठली सेल्सची दुकान त्याच भविष्य हे अंधारात आहे कारण *ऑनलाईन शॉपिंग कंपनी आज होलसेल व ग्राहकांना त्यांच्या घरा प्रयंत सेवा देत आहे त्या मुळे येत्या दहा वर्षा नंतर हे सर्व व्यवसाय बंद किंवा मंद अवस्थेत आपल्या दिसतील.* शेती हा व्यवसाय कधी बंद होत नाही, नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यातुन सावरण्याची ताकद त्या शेतकऱ्यात आहे शेती हा उत्तम व टिकाऊ व्यवसाय आहे त्याला जगातील कोणतीच कंपनी त्याला टक्कर देऊ शकत नाही कि त्याला कॉम्पिटिशन नाही.

 शेतकरी हा उत्तम व्यावसायिक आहे. शेती हा खानदानी व्येवसाय आहे, पहिले शेती व्यवसाय हा वरिष्ठ नोकरी हा कानिष्ठ मानला जायचा, आज हि शेती व्यवसाय वरिष्ठच आहे फक्त कष्ट नको म्हणून नोकरी वरिष्ठ वाटायला लागली, हेच कटू सत्य आहे पण शेती हा व्यवसाय पहिल्या सारखा कष्टाचा नाही राहिला त्यात कमालीचा बदल झाला आहे यांत्रीकीकरणामुळे अनेक काम सोपे झाले आहे. शेती हा व्यवसाय पूर्वी पासून सुरु आहे म्हूणन भारत देश हा सत्तर टक्के कृषी प्रधान आहे. शेती व्यवसाय हा पिढ्यान पिढ्या टिकणारा आहे आज तुम्ही करतताय उद्या तूमचे मुलं करतील तो न बंद होणारा व्यवसाय आहे, आज कोणताच शेतकरी जमीन विकायला तयार नाही,

शेतकरी हा उत्तमव टिकाऊ व्यवसाय आहे, भविष्यात नोकरी कोणतीच राहणार नाही म्हणून शेतकऱ्याला महत्व येणार आहे, शेतकरी मुलाची किमत येत्या सात वर्षात आपल्या कळेल त्या वेळेस आपल्या कडे पश्चाताप शिल्लक राहील. आज हि कित्येक मुलं हि फक्त लग्न करण्यासाठी साठी कंपनीत कामाला गेली आहे हे लग्न झाले कि एक मुलं झालं कि घरी येतात मग आपण भामटे होतो. तर काही लोकं मग मुलीची फारकत घेतात आणि समाजत इजत घालून घेतात. त्या पेक्षा आजच शेतकरी मुलगा निवडा तीन एकर पाच एक शेती असेल मुलगा निर्व्यसनीअसेल शेती हंगामी बागायती असेल तरी तो पाच ते सात लाखच उत्पन्न काढतो. जास्त शेती ही कोणाकडे राहिली नाही म्हणून सात एकर बारा एक हा विषय सोडून द्या. गावातून एक किंवा दोन मुलांना पाच एकर शेती वाट्याला येती जेवडी जास्त शेती तेवढच कष्ट जास्त, खर्च जास्त, नुकसान झाले तर ते जास्त प्रमाणात होते. शेती ह्या व्यवसाय कोणाचा रुबाब ऐकायची गरज नाही, टार्गेट नाही, कोणी आपले मालक नाही, कॉम्पिटिशन नाही, व्यवसाय कायम स्वरूपी टिकाऊ, शेतात थोडे फार काम केल्यामुळे शरीर मजुबूत राहते, प्रदूषण मुक्त हवा, लॉकडाउन असले तरी पाच किलोमीटर पर्यंत शेतात फिरा, सर्व भाजीपाला,दुध, आपल्याच शेतातील उपलब्ध, घर भाडे नाही, पाणीपट्टी नाही, ग्रामीण भागतील मज्जा जरा वेगळीच आहे, सर्व गाव ओळखीचं. शहरामध्ये कोण शेजारी राहते हे माहिती नसते. शेतकरी हा परत राज होणार आहे फक्त पाच वर्ष वेळ आहे म्हूणन शेतकरीच मुलगा निवडा आयुष्याच कल्याण होईल.शेतकरी हा परत राजा होणार आहे कारण त्यांना जे मुलं होती ते परत शेती करतील कारण त्यांना वरील सांगितल्या प्रमाणे रस्त्यावर भीक मागचयची वेळ येणार नाही.

English Summary: Farmers will again king of world
Published on: 25 February 2022, 05:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)