कितीही जहागीरदार असला तरी त्याला तुमच्या शेताच्या बांधावर येण्या शिवाय पर्याय असणार नाही. तो नोटा दळून खाऊ शकत नाही की डाटा मळून त्याची भाकरी करू शकत नाही.फक्त तग धरा !तेलबिया, डाळी, दूध मांस, अंडी, अन्नधान्य या शिवाय जगाला तुमच्या शिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही.
कसल्या ही परिस्थितीत जगा, जास्तीत जास्त चारा पिके घेण्याचा प्रयत्न करा, गाई, बकऱ्या, म्हशी, शेळया, कोंबडया पाळा, मुबलक शेणखत निर्माण करा, रासायनिक शेतीचा अतिआग्रह टाळा, परत तेल बियांचे क्षेत्र वाढवा, तेलघाणे परत जिवंत करा, प्रक्रिया उद्योग उभारा पन्नास साठ जण एकत्र येऊन शेतकरी कंपन्या स्थापन करा, गटशेती करा, गटाने एकत्र येऊन माल वाहतुकी साठी पिकअप, ट्रक यासारखी वाहने घ्या.Do group farming, get together as a group and get vehicles like pickups, trucks to transport goods.
गावकी, भावकी, हेवेदावे, राजकारण याचा जाळ करा, बंधुभाव जोपासा, सडक्या पुढार्यांना त्यांची जशी काशी करायची आहे तशी करू द्या.त्याच्या नादी लागू नका विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांनी जरा टाळके ठिकाणावर ठेवा. त्या मोबाईलचा जरा जाळ करा. गरजे पुरता जरूर वापरा, नवीन
माहिती जेव्हडी आपल्या गरजेची आहे तेव्हडीच घ्या. बिनकामाचे डोके हँग करू नका. नोकरीच्या भ्रमात राहू नका, शेतात जेवढे राबता येईल तेव्हडे राबा, अति मोबाईल वापरून नपूसंक बनण्या पेक्षा कधी ही हे चांगले आहे. लाज सोडा. स्वतःची भाजी स्वतः विका, मरसीडीस वाला पण तुमच्या भाजी आणि भाकरी शिवाय जगू शकत नाही. त्याची मरसीडीस
तुम्हीं खरेदी केली नाही म्हणून तुम्हांला काही फरक पडणार नाही. सारे जग तुमच्या कडे आदरानेच पाहते कारण तुमचा धंदा एक नंबरचा धंदा आहे ! आपण दोन नंबरवाले नाहीत याची जाणीव ठेवा.आपली उत्पादने सर्वोत्तम ठेवा ! दुधात भेसळ वैगेरे करू नका ! मग हक्काने पैसे घ्या लोक द्यायला आहेत ! शेतकऱ्यांच्या पोरींनी देखील आता मागे राहू नका बिंदास शेती करा ! येणारे युग तुमचे आहे !
शेतकरी विचार
Published on: 17 September 2022, 09:25 IST