Agripedia

आपले आजोबा वडील हे पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेत. तेही रासायनिक खतांचा वापर करतच होते. परंतु त्या वेळच्या जमिनी ह्या सुपीक जमिनी होत्या शेणखताचा योग्य वापर व्हायचा व त्याचबरोबर जमिनीची पोत टिकवून होती. आताचा विचार केला तर परिस्थितीत बदल झालेला आहे. कारण आपली जमीन नापीक होऊ लागले शेतकरी बांधवांनी वेळीच लक्ष दिलं तर त्याचा भला मोठा फायदा होऊ शकतो आज माती परीक्षणाचे अमूल्य फायदे शेतकऱ्यांना लक्षात येत आहेत ते आपल्या शेतीचे माती परीक्षण करुन घेत आहेत.

Updated on 20 February, 2023 10:22 AM IST

आपले आजोबा वडील हे पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेत. तेही रासायनिक खतांचा वापर करतच होते. परंतु त्या वेळच्या जमिनी ह्या सुपीक जमिनी होत्या शेणखताचा योग्य वापर व्हायचा व त्याचबरोबर जमिनीची पोत टिकवून होती. आताचा विचार केला तर परिस्थितीत बदल झालेला आहे. कारण आपली जमीन नापीक होऊ लागले शेतकरी बांधवांनी वेळीच लक्ष दिलं तर त्याचा भला मोठा फायदा होऊ शकतो आज माती परीक्षणाचे अमूल्य फायदे शेतकऱ्यांना लक्षात येत आहेत ते आपल्या शेतीचे माती परीक्षण करुन घेत आहेत.

■ माती परीक्षणाचे फायदे ■
1) माती परीक्षणामुळे जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते
2) जमीन आम्लधर्मी आहे की विम्लधर्मीय आहे त्यानुसार पिकांचे नियोजन करता येते.
3) संतुलित खतांचा वापर करता येतो पीक उत्पादन वाढीबरोबर खतांची बचत होते पिकांच्या वाढीस आवश्यक असणारे अन्नद्रव्यांचा समतोल कायम समतोल राखता येतो.
4) माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन वाढविण्यास मदत होते.
5) शास्त्रशुद्ध पद्धतीने मृदा नमुने काढण्यावर माती परीक्षण प्रयोगशाळेची गुणवत्ता व खतांची शिफारस मात्रा अवलंबून असते त्याकरिता योग्य माती नमुने प्रयोगशाळेत जमा करावेत.

■ माती परीक्षणाचे महत्व ■
मातीचा प्रातिनिधिक नमुना तयार करणे ही माती परिक्षणाची सर्वात महत्त्वाची कृती होय या नमुन्याचे रासायनिक पृथक्करण बऱ्याच अंशी अचूक सुपिक्ता दाखविते
माती परीक्षण म्हणजे शेत जमिनीतील नमुन्याचे प्रमुख्याने रासायनिक पृथक्करण करून त्यातील उपलब्ध मुख्य नत्र स्फुरद पालाश कॅल्शिअम मॅग्नेशिअम सल्फर व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे लोह जस्त मंगल तांबे बोरॉन मॉलिब्डेनम इत्यादी प्रमाण तपासणी होय. आवश्यक असल्यास जमिनीची भौतिक व जैविक गुणधर्मांची तपासणी सुद्धा केली जाते.

शिमला मिरचीने बदलले शेतकऱ्यांचे नशीब, लाखोंचा नफा

मातीचा नमुना केव्हा घ्यावा ■
1) मातीचा नमुना वर्षातून केव्हाही आवश्यक असेल तेव्हा घेता येतो परंतु रब्बी पिकांच्या काढणीनंतर किंवा उन्हाळ्यात घेतल्यास पुत्तकरण करून परीक्षण अहवाल पेरणी पर्यंत उपलब्ध होतो.
2) पिकांच्या काढणीनंतर च्या काहीवेळेस जमिनी कोरडे असताना.
3) जमिनीवर पीक उभे असताना मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर खाते दिल्यानंतर दोन महिन्यांनी मातीचा नमुना पिकांच्या दोन ओळींमधून घ्यावा.
4) कोणत्याही परिस्थितीत पिकांना दिलेल्या खतांच्या मात्रेनंतर लगेच च मातीचा नमुना घेऊ नये.

शेतकऱ्यांनो दुग्ध व्यवसायातून पैसे कमावण्याची उत्तम संधी, नाबार्डकडून मिळतंय अनुदान

जमिनीचे आरोग्य बिघडल्याने जमिन झपाटयाने नापिक होतेय..
आपण वेळीच जागे झालो नाही तर, शेती , पर्यावरण आणि समाज यांच्यावर होणाऱ्या दुष्परिणामांनं आपल्याला सामोर जावे लागेल. शास्त्रज्ञ म्हणताय ,भविष्यात मुलांना नुसता सातबारा उतारा नका देवू, त्यासोबत उत्कृष्ट पध्दतीची जमिनपण दया.

योग्य दिशेने प्रयत्न केले तर आपण आपली जमिन वाचवू शकतो..
योग्य खत व्यवस्थापन आणि फायदेशीर शेती उत्पादन यासाठी मातीपरिक्षण हे एक शेतीच अवश्य अंग आहे .
माती परिक्षणामुळे आपल्या जमिनीचा सामु किती आहे, त्यात कुठले अन्नघटक किती प्रमाणात कमी जास्त आहेत हि माहिती मिळते. ह्यामुळे शेतकरी बांधवांच्या खर्चात बचत होवून. संतुलीत खतांचा वापरून भरघोस उत्पादन काढता येते. माती परिक्षणाचे अमुल्य फायदे शेतकरी बांधवांना कळत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांचा, रयतेचा राजा, राजा शिवछत्रपती, जाणून घ्या शिवकालीन शेतकऱ्यांसाठीची धोरण..
जमिनीएवढेच महत्त्व पाण्याच्या उत्पादकतेला, शेतकऱ्यांनो समजून घ्या..
ऊस उत्पादनाचा आलेख वाढवला, एकरी ८५ टनांवरून ११३ टनांपर्यंत उत्पादन

English Summary: Farmers take care of soil health
Published on: 20 February 2023, 10:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)