Agripedia

शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी नवनवीन तणनाशकाचा वापर करत असतात. परंतु काही तणनाशके हे शेतीसाठी घातक ठरत असतात, हे कित्येक शेतकऱ्यांना माहीत नसते. आज आपण अशाच एका तणनाशकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या वापरावर सरकारने बंदी घातली आहे.

Updated on 28 October, 2022 10:10 AM IST

शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी नवनवीन तणनाशकाचा (herbicide) वापर करत असतात. परंतु काही तणनाशके हे शेतीसाठी घातक ठरत असतात, हे कित्येक शेतकऱ्यांना माहीत नसते. आज आपण अशाच एका तणनाशकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या वापरावर सरकारने बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने देशात ग्लायफोसेट या तणनाशकाच्या वापरावर बंधने आणली आहेत. ग्लायफोसेटच्या (Glyphosate) वापरावर बंधने आणण्याची मागणी दोन वर्षांपासून केली जात होती.

आता दुधाचे उत्पादन होणार दुप्पट; 'या' जिल्ह्यात राबविण्यात येणार आनंद पॅटर्न प्रकल्प

केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकतेच प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "ग्लायफोसेट तणनाशकच्या वापरावर आता बंधन घालण्यात आली आहेत. व्यावसायिक कीटक नियंत्रकाशिवाय कुणालाही तणनाशकाचा वापर करता येणार नाही. तसंच सरकारने ग्लायफोसेटसाठी देण्यात आलेले नोंदणी प्रमाण नोंदणी समितीकडे परत करण्यास सांगितले आहे. या प्रमाणपत्रधारकांना आता प्रमाणपत्रावर मोठ्या अक्षरात व्यावसायिक कीटक नियंत्रकामार्फत ग्लायफोसेट फॉर्म्युलेशनच्या वापरास परवानगी आहे, असा संदेश लिहून देण्यात येणार आहे. म्हणजेच या प्रमाणपत्रधारकांकडूनच म्हणजेच व्यावसायिक कीटक नियंत्रकाकडून तणनाशकाचा वापर करता येणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे".

दिलासादायक! 'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

तणनाशकामुळे जमिन आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम होतात, असा दावा केला जातोय. मात्र तणनाशकामुळे शेतकऱ्यांचा मजुरांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला, हेही पाहायला मिळते. आता व्यावसायिक कीटक नियंत्रकाच्या बंधानामुळे पुन्हा शेतकऱ्यांचा खर्च वाढणार असल्याचे चित्र पाहायला मिळेल.

ग्रामिण भागात व्यावसायिक कीटक नियंत्रक (Pest Control) किती असतील. पिकांमध्ये एकाच वेळी सगळीकडे तण वाढते. पाऊस उघडला की लेगच फवारणी करावी लागते. त्यामुळे व्यावसायिक कीटक नियंत्रक उपलब्ध होतील का? तसेच खर्च शेतकऱ्यांना परवडणारा असेल का? हा सुद्धा प्रश्न उपस्थितीत होतो.

महत्वाच्या बातम्या 
'या' महिन्याचे शेवटचे दिवस तुमच्यासाठी कसे असतील? जाणून संपूर्ण राशीभविष्य
तुषार सिंचनाचा वापर करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी; कमी जागेत मिळेल भरघोस उत्पादन
शेतकऱ्यांनो पीक नुकसानीबाबत माहिती भरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

English Summary: Farmers spray important herbicide Banned government
Published on: 28 October 2022, 10:05 IST