सध्या सुपर मार्केट व जनरल स्टोअर्समध्ये वाईन ठेवण्याच्या निर्णयावरून बरीच उलट सुलट चर्चा, वादंग सुरू आहे. (बियर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण -ABV 4 ते 8% असते तर वाईन मध्ये 9 ते 18% असते. ह्या निकषाप्रमाणे वाईन दारूच आहे) असो.
पण ह्या वादापेक्षा वाईन, कापड, दुग्धजन्य पदार्थ, इथेनाॕल, तेल वगेरै उत्पादनाच्या मुल्यवृद्धीच्या नफ्यावर कच्चा माल पुरविणाऱ्या शेतकऱ्यांचा हक्क असला पाहीजे व नफा वाटप सुत्र काय पाहीजे, हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे.
माझ्या जुन्या लेखातील उताराः
प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांचा 100 ते 250% पर्यंत नफा असतो.
दुध मूल्य आयोगाने सर्वांगिण अभ्यास करून नफ्याचा काही हिस्सा दुग्ध व्यावसायीक शेतकऱ्यांना देण्याचे सूत्र मांडले पाहिजे...... प्रक्रिया उद्योगांचे, वार्षिक उलाढाल/नफ्यानुसार तीन वर्गीकरण करून, प्रत्येकाला "मूल्यवर्धन नफा निधी" ठरविण्यात येऊन त्याचे तिमाही शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे.
ह्या मागण्यांची पुर्तता केल्यास त्याचे दूरगामी परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी तरी येईलच.
व त्याचा बायप्रॉडक्ट म्हणून पशुधन वाढून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासही मदत होईल.
मुल्यवृद्धीच्या नफ्याच्या वाट्यावर कच्चा माल पुरविणाऱ्या शेतकऱ्यांचा हक्क आहे" ही नावीन्यपूर्ण संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी झाली तर ती इतर पिकांना जसे कापूस (Textile Industries), सोयाबीन (Oil Industries), ऊस (Sugar Industries) वगैरेंसाठी लागू करता येईल.प्रक्रिया उद्योगांचे, वार्षिक उलाढाल/नफ्यानुसार तीन वर्गीकरण करून, प्रत्येकाला "मूल्यवर्धन नफा निधी" ठरविण्यात येऊन त्याचे तिमाही शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे.
ह्या मागण्यांची पुर्तता केल्यास त्याचे दूरगामी परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी तरी येईलच
जनरल स्टोअर्समध्ये वाईन ठेवण्याच्या निर्णयावरून बरीच उलट सुलट चर्चा, वादंग सुरू आहे. (बियर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण -ABV 4 ते 8% असते तर वाईन मध्ये 9 ते 18% असते. ह्या निकषाप्रमाणे वाईन दारूच आहे) असो.
पण ह्या वादापेक्षा वाईन, कापड, दुग्धजन्य पदार्थ, इथेनाॕल, तेल वगेरै उत्पादनाच्या मुल्यवृद्धीच्या नफ्यावर कच्चा माल पुरविणाऱ्या शेतकऱ्यांचा हक्क असला पाहीजे व नफा वाटप सुत्र काय पाहीजे, हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे.
Published on: 03 February 2022, 09:43 IST