चिखली- तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.यामध्ये सोयाबीन,उडीद, मुंग,तुर पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने कृषी सहाय्यक,कंपनी प्रतिनीधी यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करीत पंचनामेदेखील केले होते.परंतु नुकसान झाल्याचे समोर आले असतांना संबंधित विमा कंपनीने याकडे डोळेझाक करीत शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत विमा रक्कम जमा न केली नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून सदर नुकसानग्रस्त शेतकरी व स्वाभिमानी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असून पिक रक्कम कमी मिळणे,प्रिमीयम पेक्षा कमी रक्कम प्राप्त व तुटपुंजी रक्कम मिळाणे,यासह विविध समस्यांचा पाढा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे मांडत वाचत पिक विमा धारक शेतकर्याच्या खात्यावर रक्कम जमा करावी,स्वातंत्र तक्रारीचा निपटारा चार ते आठ दिवसात करण्यात यावा,अशी मागणी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी शेतकर्यासमवेत दि05जानेवारी रोजी केली असुन चिखली कृषी कार्यालयासमोर नुकसानग्रस्त पिक विमा धारक शेतकर्यानसमवेत बेमुदत ठिय्या आंदोलन छेडु असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
काहि महिण्या अगोदर चिखली तालुक्यातील शेतकर्याचे अतिवृष्टि मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्याने जमीनी खरडुन जाने सततधार पावसामुळे पिकास कोंब फुटल्याने अतोनात नुकसान झाले होते.तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2020-21अंतर्गत काढणी पश्चात व हंगामातील प्रतिकुल परीस्थीती यामुळे नुकसान झालेल्यांसाठी शासनाकडुन पिक विमा मंजुर करण्यात आला आहे.यासाठी स्वाभिमानी चे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.तर तालुका स्तरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन शेतकरी हिताच्या दृष्टिने आंदोलने करण्यात आल्याने चिखली तालुक्यातील हजारो शेतकर्याच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम प्राप्त झाली परंतु यामधे अनेकांना प्रमियम पेक्षा कमी रक्कम मिळणे,विमा काढला कंपनीकडे आॅफलाइन+आॅनलाइन तक्रार सादर केली परंतु पैसे न खात्यावर जमा न होणे,अनेकांना सोयाबीन,उडीद,मुंग,तुर असा विमा काढला त्यांना एकाच पिकाचे पैसे टाकण्यात आले,अर्ज करताना पासबुक,आधारकार्ड सोबत जोडले असतांना अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड चुकले असतांना शेतकर्याच्या नावासमोर यादीमधे पैसे पेड दाखवणे,
नदिकाठच्या शेतकर्याचे अतोनात नूकसान होऊन देखील कमी पीक विमा रक्कम देणे,यासह विविध प्रकारच्या असंख्य तक्रारी शेतकर्याकडुन प्राप्त होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे या समस्यांचा पाढा वाचत पिक विमा कंपनी विरोधात तक्रार देण्यात आली आहे.तर शेतकर्याच्या विविध समस्यांच्या स्वातंत्र अर्ज कृषी विभाग,विमा कंपनीकडे सादर करण्यात आल्या आहेत.तर वेळोवेळी आंदोलने व तक्रारी होऊन देखील पिक विमा समस्या सोडवण्याच्या दृष्टिने शासनाने नेमलेली तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय समिती करती तरी काय?असा सवाल शेतकर्यासह स्वाभिमानी ने उपस्थीत केला असुन तालुक्यातील शेतकर्याच्या स्वातंत्र तक्रारीचा निपटारा चार ते आठ दिवसात करा,शासन नियमांची अमलबजावनी न करणे,व शेतकरी यांना वेठीस धरुण हेळसांड करणे व प्रिमीयम पेक्षा कमी रक्कम देत फसवणुक करणे,प्रशासनास वेळोवेळी दिशाभुल व चुकीची माहिती पिक विमा कंपनीकडुन मिळत असल्याने विमा कंपनीवर शेतकर्याचे पैसे देण्याची जबाबदारी फिक्स करुण गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडुन करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्यांची दखल न घेतल्यास कृषी कार्यालयासमोर शेतकर्यासह बेमूदत ठिय्या आंदोलनाचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.यावेळी विनायक सरनाईक,अनिल चौहाण,विलास तायडे,शुभम पाटिल,रवि टाले,सतिष सुरडकर,प्रल्हाद देव्हडे,भारत गाढवे,रामेश्वर चिकने,उमेश करवंदे,प्रकाश बनसोडे,आशु ,गणेश भोलाने,गणेश हाडे, अजय झोल,विष्णू हाडे,गणेश सोलाट यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 06 January 2022, 02:01 IST