Agripedia

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत चांगले उत्पादन घेत असतात. मात्र शेतकऱ्यांना अनेक पिकांबद्दल माहीत नसते ज्यातून चांगले उत्पादन घेऊ शकतील. आपण अशाच एका शेतीविषयी माहिती घेणार आहोत, ज्यातून शेतकरी बंपर नफा मिळवू शकतील.

Updated on 18 August, 2022 3:03 PM IST

शेतकरी आपल्या शेतीमध्ये (agriculture) नवनवीन प्रयोग करत चांगले उत्पादन घेत असतात. मात्र शेतकऱ्यांना अनेक पिकांबद्दल माहीत नसते ज्यातून चांगले उत्पादन घेऊ शकतील. आपण अशाच एका शेतीविषयी माहिती घेणार आहोत, ज्यातून शेतकरी बंपर नफा मिळवू शकतील.

आपण आज अक्रोडाच्या शेतीविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. अक्रोडाची लागवड देशातील डोंगराळ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही त्याची मागणी खूप जास्त आहे. यामुळेच शेतकऱ्यांना अक्रोडाच्या उत्पादनावर चांगला नफा मिळतो.

जर तुम्हाला अक्रोडाची लागवड (Cultivation of walnuts) करायची असेल, निवडलेल्या शेतीमध्ये पाण्याचा निचरा करण्याची पुरेशी व्यवस्था असावी. अतिशय उष्ण आणि अतिशय थंड अशा दोन्ही हवामानात योग्य राहील. अक्रोडाच्या लागवडीसाठी 20 ते 25 अंश तापमान आवश्यक असते.

Modi Government: मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; 'या' योजनेला दिली मंजूरी

रोपवाटिका पद्धतीने लागवड

अक्रोडाची रोपे (Walnut seedlings) रोपवाटिकेत लावण्याच्या सुमारे एक वर्ष आधी मे आणि जून महिन्यात तयार केली जातात. रोपवाटिकेत त्याची रोपे तयार करण्यासाठी कलम पद्धतीचा वापर केला जातो. जुलै-ऑगस्ट महिन्यापासूनच रोपवाटिकेची तयारी करावी लागते. ते तयार करण्यासाठी सुमारे 2 ते 3 महिने लागतात. डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्ही ते शेतात लावू शकता.

सिंचनापासून कापणीपर्यंत

अक्रोड रोपाला उन्हाळ्यात दर आठवड्याला आणि हिवाळ्यात 20-30 दिवसांनी पाणी देत ​​रहा. त्याच्या रोपाचा पूर्ण विकास होण्यासाठी 7-8 महिने लागतात. ते 4 वर्षानंतरच फळ देण्यास सुरुवात करतात आणि सुमारे 25-30 वर्षे उत्पादन देत राहतात. महत्वाचे म्हणजे अक्रोडच्या फळाची वरची साल फुटल्‍यानंतर ते तोडण्‍यास सुरूवात करावी.

पीएम किसान योजनेबाबद महत्वाची बातमी; पती-पत्नीला लाभ मिळण्यासंदर्भात नवीन नियम लागू

मिळतो इतका नफा

बाजारात बहुतांश वेळा अक्रोडाची किंमत (Walnut price) फक्त ४०० ते ७०० रुपये प्रतिकिलो राहते. यातील एक रोप 40 किलोपर्यंत उत्पादन देते. त्यानुसार एका रोपातून शेतकऱ्याला 2800 रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. जर शेतकऱ्याने 20 अक्रोडाची रोपे लावली तर त्याला 5 ते 6 लाखांपर्यंतचा नफा सहज मिळेल.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांना 'या' योजनेतून मिळणार 65 हजार मानधन; अंतिम मुदत 22 ऑगस्ट, त्वरित घ्या लाभ
Agriculture Cultivation: 'या' शेतीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मिळेल बंपर नफा; जाणून घ्या सविस्तर
आता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार; शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने घेतला 'हा' मोठा निर्णय

English Summary: Farmers millionaires through walnut cultivation
Published on: 18 August 2022, 03:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)