Agripedia

आपल्या भागात जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर कडुनिंब अाढळतो.

Updated on 15 May, 2022 11:46 AM IST

त्याच्या निंबोळ्यांचा वापर एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापनात केल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करता येतो. कडुनिंबाच्या पक्व निंबोळ्या गोळा करून वाळवून साठवून ठेवाव्यात. त्यापासून घरच्या घरी कमी खर्चात उत्तम दर्जाचे वनस्पतीजन्य कीटकनाशक बनवता येते जागरूक होऊन निंबोळी अर्काचा वापर वाढवावा निंबोळ्याच्या बियांमधून निंबोळी तेल मिळते यामध्ये ॲझाडिराक्टीन नावाचे रसायन असते त्यात कीटकनाशकाचे गुणधर्म असतात

निंबोळीची मागणी आज दिवसेंदिवस वाढत आहे.उन्हाळ्यात पक्व झालेल्या निंबोळ्या ठराविक दर देऊन गोळा करून घेता येतील त्याचप्रमाणे युवकांनी किंवा बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन त्यापासून निंबोळी पावडर व निंबोळी अर्क निर्मितीचा लघुउद्योग सुरू केल्यास ते सर्वांसाठी फायदेशीर ठरू शकते यातून पर्यावरणाची हानीदेखील थांबवता येते

निंबोळीतील ॲझाडिराक्टीनचे विविध गुणधर्म -१) परावृत्तक (रिपेलंट) २) भक्षण रोधक (ॲंटीफीडंट) ३) अंडी घालण्यास व्यत्यय- ४) प्रजोत्पादनात व्यत्यय- (स्टरीलंट) ५) कात टाकण्यावर परिणाम ६) किडीच्या वाढीवर परिणाम ७) प्रौढ किडींची उडण्याची क्षमता कमी होणे ॲझाडिराक्टीनची प्रारूपे- बाजारात ॲझाडिराक्टीन हे ३०० ते ३००० पीपीएम तीव्रतेनुसार उपलब्ध आहे.- नीम अर्क- निंबोळीच्या ५ टक्के अर्काची शिफारस आहे. 

- निंबोळी तेल-साधारणतः १.० ते २.० टक्के तेलाच्या फवारणीची शिफारस आहे.- निंबोळी पावडर- कडुनिंबाची पाने किंवा निंबोळ्या वाळवून त्यांची पावडर करून ती १ ते २ टक्के या प्रमाणात धान्य साठवणुकीसाठी वापरतात.निंबोळीच्या दाण्यापासून तयार केलेली भुकटी पाण्यात मिसळून त्याची फवारणी करतात.४.दाणेदार खतावर आवरण- दाणेदार युरियातील अमोनियाचे विघटन टाळण्यासाठी त्यावर निंबोळी अर्काचे आवरण देतात.त्यामुळे जमिनीत युरिया टाकल्यावर जमिनीतील किडींचे काही प्रमाणात नियंत्रण होते. 

English Summary: Farmers, let's collect neem leaves and start a pesticide factory at home
Published on: 15 May 2022, 11:46 IST