शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत, कलिंगड हे पीक पूर्वी नदीकाठच्या भागामध्येच पावसानंतर नदीकाठचे पाणी ओसरल्यावर तेथे जानेवारीत लागवड केली जात असे, अशी नदीकाठची जमीन भाडेपट्टीने लागवडीसाठी घेतली जाते. हवा, पाणी पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे वेलींची वाढ झपाट्याने होते.
उन्हाळ्यात अकाली येणाऱ्या ढगाळ हवेमुळे या लोकांची झोप उडत असुन एप्रिल, मेच्या पावसात पीक सापडल्यामुळे आलेला माल वाहून जात असे, या परिस्थितीमुळे भागातील लोकांना प्रचंड नुकसानीस ४०-५० वर्षापासून तोंड द्यावे लागत होते.
मागील २० वर्षापासून लागवडीची व्यवस्थित काळजी घेतल्याने मिळणारा आर्थिक फायदा पाहून हे पीक पूर्वीसारखे नदीकाठच्या भागातच न घेता बागायती पीक म्हणून शेतकरी घेऊ लागले आहेत, शहरी मार्केटला (दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर ) पाठवून आखाती राष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागली आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आजपासून मोबदला जमा होणार
महाराष्ट्रामध्ये कलिंगड,खरबूज ही २ पिके घेतली जातात महाराष्ट्रात कलिंगडाची अंदाजे १०३५ हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची २७१ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. कच्या कलिंगडाची भाजी, लोणच्यासाठी उपयोग केला जातो, कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट थंडगार असते. खरबुजाचे फळ मधुर स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुघंध असतो. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे अ,ब,क जीवनसत्वे काही प्रमाणात असतात.
वेलांच्या बुंध्याजवळील माती खुरपून भुसभुशीत करुन वेलास मातीची भर द्यावी, रानातील मोठे तण हातानी उपटून टाकावे. भारी जमिनीत बे पेरल्यानंतर पाणी देऊ नये. कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडक होतो. अशा जमिनीस प्रथमतः पाणी देऊन वाफसा आल्यानंतर बी टोकावे. फळांचे वाळवी, ओलाव्यापासून संरक्षण करण्यासाठी फळांच्या खाली भाताचा पेंढा किंवा सुके गवत पसरावे.
या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पुढचा हप्ता, जाणून घ्या काय आहेत नवे नियम?
हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते, चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणाऱ्या सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट, बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते.
लागवडीसाठी हलकी, पोयट्याची मध्यम काळ्या ते करड्या रंगाची (डी किंवा जी सॉईल असलेली) मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असुन पिकांकरिता जमिनीचा सामू ५.५ ते ७ योग्य असतो, या पिकाच्या लागवडीसाठी वाळूमय, मध्यम काळी पोयट्याची निचरा न होणा-या जमिनीत या पिकाची वाढ योग्य प्रकारे होत नाही. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभ्या दगडाच्या जमिनीत तसेच महाराष्ट्रातील इतर भागात मध्यम प्रतिच्या चांगल्या निच-याच्या जमिनीत हे पीक उत्तम प्रकारे येते.
16 लाख फुलांच्या सुगंधाने भरलेले आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन
या राज्यांना मागे टाकून दूध आणि लोकर उत्पादनात राजस्थान पुढे आले, योजनांचा होतोय फायदा
शेतकऱ्यांनी मिळून गावाला केळीचे केंद्र बनवले, शेतावर प्रक्रिया युनिट उघडले, आता लाखोंची कमाई
Published on: 31 March 2023, 10:19 IST