Agripedia

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक प्रयत्न करत असते. आता आपण याबाबतच एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 10 October, 2022 11:30 AM IST

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार (central and state government) अनेक प्रयत्न करत असते. आता आपण याबाबतच एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपुष्टात याव्यात यासाठी ऑल इंडिया कॉटन फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असोसिएशनतर्फे (association) मागील वर्षीपासून घाटंजी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय कापूस उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला.

यामध्ये सध्या 500 शेतकऱ्यांचा सहभाग आहे. सहभागी शेतकऱ्यांना सामूहिक बीज खरेदी, नैसर्गिक खत, निंबोळी अर्क निर्मिती यासह आवश्यक प्रशिक्षण दिले गेले. इतर शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी तसेच समजावून सांगण्यासाठी डेमो प्लॉट तयार करण्यात आला आहे.

LIC जीवन उमंग पॉलिसी: दररोज फक्त 45 रुपये गुंतवा आणि मिळवा 36 हजार रुपयांचा लाभ

या प्रकल्पाला विश्वमान्य संस्थेकडून सर्टिफिकेशन (Certification) दिले जात आहे. यावर्षी दिवाळी दरम्यान प्रकल्पाला दुसरे सर्टिफिकेशन मिळेल. तीन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जगभरातील कंपन्या याठिकाणी येऊन सेंद्रिय कापूस नेतील. या वर्षी सुद्धा या प्रकल्पातील शेतकऱ्यांचा कापूस विक्री करून देण्यात आला आहे.

सावधान! तुमच्या 'या' एका सवयीमुळे जीवाला होऊ शकतो धोखा; वेळीच घ्या काळजी

कापूस वेचणी बॅगचे मोफत वाटप

घाटंजी या तालुक्यात जागतिक कापूस (cotton) दिन साजरा करण्यात आला. याठिकाणी तज्ज्ञ शेतकऱ्यांना सेंद्रिय कापूस शेतीचे महत्त्व पटवून देत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना ५० किलो कापूस वेचणी बॅगचे मोफत वाटप देखील करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 
सांगलीकरांसाठी महत्वाची बातमी; जिल्ह्यात 1 हजार 557 कोटींचे कर्ज वाटप
सर्वसामान्यांना मोठा फटका! दिवाळीच्या तोंडावर डाळीं आणि खाद्यतेलाच्या किमतीत वाढ
12 वर्षानंतर वृषभ, मिथुन, कर्क राशीच्या लोकांना धनलाभाचा योग; राशीभविष्य काय सांगतंय? जाणून घ्या

English Summary: Farmers income increase Organic cotton project launched cotton growers
Published on: 10 October 2022, 11:24 IST