राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालया मार्फत 15 ऑगस्ट 2021 पासून संपुर्ण राज्यात करण्यात येत आहे. सध्या खरीप हंगाम 2022 हंगामाची ई. पीक पहाणीची कार्यावाही सूरु आहे. खरीप हंगाम 2022 च्या पीक पाहणीच्या
नोंदणीसाठी ई-पीक पाहणी से 20.3 हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध करून दिले आहे.The version is made available on Google Play Store.
१६ ओक्टोबर विशेष; जागतिक अन्न दिन
आता पर्यंत सुमारे 1 कोटी 22 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी अॅप वर आपली नोंदणी केली आहे.खरीप हंगाम 2022 श्री ईपीक पाहणी प्रत्यक्ष मोबाईल अॅपद्वारे करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2022
हि अंतिम तारीख निश्चित करून देण्यात आली होती. तथापि राज्याच्या काही भागात उशिराच्या मान्सूनमुळे काही शेतक-यांना अदयापही आपली ई-पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही. याचा विचार करून मा. जमाबंदी आयुक्त सो. पुणे यांचे मान्यतेने मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरील ई- पिक पाहणीची
कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2022 च्या शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणीची कालमर्यादा 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी सर्व शेतकरी बंधूना अवाहन करण्यात येते की त्यांनी आपली खरीप हंगाम 2022 ची ई-पीक
पाहणी या वाढीव मुदतीत म्हणजेच दिनांक 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत मोबाईल अॅप द्वारे ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी.असे आवाहन (श्रीरंग तांबे ( उप जिल्हाजिकारी व राज्यसमन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे, यांच्याकडून करण्यात आले आहे.
Published on: 16 October 2022, 04:41 IST