Agripedia

सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्तानिकरीत्या तयार केलेल्या

Updated on 14 November, 2022 11:56 AM IST

सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्तानिकरीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदयाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो.

शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता Interested farmers should register online at https://mahadbtmahait.gov.in. राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.

एकात्मिक पैक हाऊस करायचाय? यामधून मिळेल चांगले अर्थसहाय्य

१.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.२. अर्थसहाय्यचे स्वरूप - ५, १०, १५, २० व

२५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये ३५००/- प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील.एका लाभार्थ्याला २५ मे टन क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील. 

३.ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे अ . ७/१२ब. ८ अ क.आधार कार्डाची छायांकित प्रत ड.आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रतइ.जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)ई.यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र

English Summary: Farmers grow onions through this scheme, they will get great help
Published on: 13 November 2022, 07:17 IST