सध्या तरुणांनी युट्यूब आणि सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून पिकांची माहिती घेऊन चांगली पीकं घेतली आहेत. तरुण आधुनिक शेती करत आहेत. पारंपारीक शेती (Agriculture News) शेतकरी करीत असल्यामुळे त्यातून मिळणार उत्पन्न हे अत्यल्प आहे.
त्यातून अधिक मिळकत नसते. त्यामुळे सध्या अनेक तरुण शेतकरी बागायती शेती करताना दिसत आहेत. अवकाळी पावसाने (Unseasonal rain news) शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी आपली व्यथा सरकारी दरबारी मांडत असल्याचं आपण विविध माध्यमातून पाहत आहोत.
पारंपरिक शेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात येत असलेल्या खोलमारा येथील अमृत मदनकर यांनी तीन एकर शेतीत कारल्याची लागवड करीत लाखो रुपये कमावले आहेत. यामुळे या शेतकऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात कोरोना प्रकाराची सर्वाधिक रुग्ण, काळजी घेण्याचे आवाहन
त्यांच्या कार्याची दखल घेत सरकारने प्रगतीशील शेतकरी अमृत मदनकर म्हणून त्यांचा गौरवसुद्धा केला आहे. या शेतकऱ्याने अवकाळी पावसाला खचून न जाता कृषी विभागाचा सल्ला घेत पारंपरिक धानशेतीलाफाटा देत बागायती शेतीकडे वळून तीन एकर शेतीत आधुनिक पद्धतीने कारल्याची लागवड केली.
जरबेरा फुलशेतीत भरघोस कमाई, शेतकऱ्यांचे नशीब बदलणार!
यामध्ये एका वर्षात तब्बल दहा लाख रूपयाचे उत्पन्न घेतले. एवढेच नव्हे तर कारल्यासोबत काकडी, वाल्याच्या शेंगा चंदन, गाजर आणि इत्यादी पालेभाज्यांचे उत्पन्न घेत आहेत. यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.
राज्यात गहू काढणीला वेग, पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा कष्टमय प्रवास...
शेतकऱ्यांनो वाळवी कीटकापासून घ्यावयाची काळजी
राज्यात कोरोना प्रकाराची सर्वाधिक रुग्ण, काळजी घेण्याचे आवाहन
Published on: 27 March 2023, 10:46 IST