Agripedia

भारतात बरेच शेतकरी भाजीपाल्याच्या शेतीला प्राधान्य देतात. भाजीपाला हे असे पीक आहे जे तुम्ही वर्षभर लागवड करून उत्पन्न घेऊ शकता. योग्य लागवड पद्धतीने भाजीपाला लागवड कशी करावी? याविषयी जाणून घेऊया...

Updated on 25 July, 2022 4:07 PM IST

भारतात बरेच शेतकरी (farmers) भाजीपाल्याच्या शेतीला (agriculture) प्राधान्य देतात. भाजीपाला हे असे पीक (crop) आहे जे तुम्ही वर्षभर लागवड करून उत्पन्न घेऊ शकता. योग्य लागवड पद्धतीने भाजीपाला लागवड (Planting vegetables) कशी करावी? याविषयी जाणून घेऊया...

शेतकरी ज्या भाजीपाला लागवडीतून दर महिन्याला लाखों रुपये कमवू शकतात. अशा भाज्यांबद्दल माहिती जाणून घेऊया...

1) चेरी टोमॅटो

शेतकरी चेरी टोमॅटो ची लागवड करून महिन्याला लाखों रुपये कमवू शकतात. माहितीनुसार चेरी टोमॅटो (Cherry Tomatoes) ही भाजी रोजच्या आहारासाठी व आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.

चेरी टोमॅटोची झाडे (Cherry tomatoes tree) शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. शेतकऱ्यांचा फायदा पाहिला तर ही झाडे बाजारात 150 ते 250 च्या आसपास विक्री होतात. शेतकरी या झाडांची लागवड करून चांगले उत्पन्न घेऊ शकतात.

हे ही वाचा 
Petrol Diesel Rate: पेट्रोलचे दर पुन्हा स्थिरावले; जाणून घ्या आजचे नवीन दर

2) झुकिनी

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी झुकिनीच्या भाज्यांचा वापर करतात. या भाजीला बाजारातही मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. बाजारात या भाजीला चांगली मागणी आहे. म्हणून शेतकऱ्यांनी शेतीत (Agricultural Information) या भाजीची लागवड केली तर अधिक फायदा होईल.

3) शतावरी

भारतात सर्वात महाग भाजीपाला शतावरी विकली जात आहे. ही भाजी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याचे बोलले जाते. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले, तर ते 1200 रुपये प्रति किलोने विकले जाते. पेरणीच्या (Sowing) दीड वर्षानंतर 18 महिन्यांत शतावरी काढणीसाठी तयार होते. या शेतीतून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.

हे ही वाचा 
Arvind Kejriwal: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: पुढील 5 वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जाणार

4) मशरूम

सध्या शेतकरी मशरूमची लागवड (Mushroom Cultivation) करण्यावर अधिक भर देत आहेत. मशरूमची लागवड करण्यासाठी शेत नाही तर घराची गरज लागते.अंधाऱ्या खोलीत मशरूमची लागवड केली जाते. बाजारात साधारण मशरूमची किंमत 150 ते 250 रुपये प्रति किलोपर्यंत आहे.

5) बोक चॉय

बोक चॉय ही भाजी परदेशात पिकवली जाणारी भाजी आहे.परंतु आता हळूहळू भारतातही त्याची लागवड केली जात आहे. परदेशी भाजीपाला असल्याने या भजीची लागवड भारतात कमी आहे, त्यामुळे भारतीय बाजारपेठेत या भाजीची किंमत जास्त राहते.

महत्वाच्या बातम्या
Crop cultivation! फायदेशीर लागवड; शेतकऱ्यांनो पावसाळ्यात 'या' पिकाची शेती करा व्हाल लखपती
भारीच की! 'या' तंत्रज्ञानाचा वापर करून वाढवा भाजीपाला; कमी वेळेत मिळणार दुप्पट उत्पन्न
business Earning: काय सांगता? 'या' व्यवसायातून होतेय महिना 5 लाखांपर्यंत कमाई; एकदा पहाच..

English Summary: Farmers farming Diwali life about farming
Published on: 25 July 2022, 03:56 IST