Agripedia

"दादा, पंप घेतलाय भारी…पण बॅटरी २ महिन्यांतच निकामी झाली!" "नवीन चार्ज केलं, तरी अर्ध्या पायात बंद पडतं!" "बॅटरी गॅरंटीमध्ये बदलली, पण परत तीच गोष्ट!"

Updated on 08 July, 2025 1:40 PM IST

प्रस्तावना

"दादा, पंप घेतलाय भारी…पण बॅटरी २ महिन्यांतच निकामी झाली!"

"नवीन चार्ज केलं, तरी अर्ध्या पायात बंद पडतं!"

"बॅटरी गॅरंटीमध्ये बदलली, पण परत तीच गोष्ट!"

अशा तक्रारी शेतकऱ्यांमधून वाढत आहेत. मग असं वारंवार बॅटरी का खराब होते? दोष पंपाचा की वापराचा? चला, समजून घेऊया...

ही आहेत बॅटरी खराब होण्याची मुख्य कारणं-

१. बॅटरी चुकीच्या पद्धतीने चार्ज करणे.

२. बॅटरी पूर्ण discharge झाल्यावर लगेच चार्ज करावी.

३. बॅटरी फक्त १-२ तास चार्ज करून काढणे चुकीचं आहे

४. ओव्हरचार्ज (10-12 तासांपेक्षा जास्त वेळ चार्ज करणे) केल्यास बॅटरी फुगते.

५. चुकीचा चार्जर वापरल्यास बॅटरी खराब होते

६ "जशी माणसाला वेळेवर जेवण हवं, तशी बॅटरीला वेळेवर योग्य चार्जिंग हवं!"

७. अति उष्णता किंवा थेट उन्हात ठेवल्याने नुकसान

८. चार्जिंगच्या वेळी थेट उन्हात पंप ठेवणं

९. पंप वापरल्यानंतर धूप किंवा ओलसर ठिकाणी ठेवणं

१०. बॅटरीवर थेट पाणी पडल्यास शॉर्टसर्किट होऊ शकतं

११. वजनदार किंवा लोकल पंप वापरणे.

१२. अनेकदा स्वस्तात मिळणाऱ्या लोकल पंपमध्ये लो दर्जाची बॅटरी बसवलेली असते.

१३. मोटरची क्षमता जास्त, पण बॅटरी लहान- यामुळे ओव्हरलोड

१४. कंपनीची बॅटरी स्पेसिफिकेशन नसल्यास हमखास बिघाड.

१५. बॅटरी सतत पूर्ण discharge होऊ देणे.

१६. बॅटरी पूर्णपणे झिरो झाल्यावर काही जण २–३ दिवस चार्जच करत नाहीत हे बॅटरीच्या पेशी (cells) साठी घातक आहे.

१७. एकदा खराब झाली की ती recharge झाली तरी performance जातं

१८. पंप व बॅटरीची स्वच्छता न राखणे.

१९. फवारणी करताना औषध बॅटरीवर सांडते

त्यातून गंज निर्माण होतो, वायरिंग खराब होते आणि बॅटरी शॉर्ट होते.

बॅटरीची काळजी कशी घ्यावी?

 १. दर वेळी वापरल्यानंतर पूर्ण चार्ज करा.

२. रात्री चार्जिंग करताना टायमर लावा- 6 ते 8 तास पुरेसे.

 ३. बॅटरी व पंप नेहमी थंड, कोरड्या ठिकाणी ठेवा

 ४. नेहमी ओरिजनल चार्जरच वापरा.

५. महिन्यातून एकदा बॅटरी फुल discharge होण्याआधीच चार्ज करा.

६. वायरिंग/स्विच तपासत रहा – शॉर्ट झालेले तर लगेच बदला.

खरेदी करताना काय बघावं?

१. कंपनीचं नाव- गॅरंटी असलेली बॅटरी निवडा

२. बॅटरीची क्षमता- किमान 12V/8Ah किंवा त्याहून अधिक.

३. चार्जर- ऑटो कट असलेला चार्जर घ्या.

४. वजनदार, branded lithium-ion battery पंप उत्तम ठरतो.

निष्कर्ष:

१. "पंप खराब नाही…वापर चुकीचा आहे!"

बॅटरीची योग्य काळजी घेतली, तर ती १.५ ते २ वर्ष टिकू शकते.

२. वारंवार बदल करत राहणं म्हणजे वेळ, पैसा आणि मेहनतीचं नुकसान.

अति महत्वाचे-

* "तुमच्या औषधापेक्षा पंपाची बॅटरी जास्त महत्त्वाची आहे…ती जर वेळेवर साथ दिली नाही, तर मेहनत वाया!"*

लेखक

नितीन रा. पिसाळ

पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक

फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण

English Summary: Farmers!! Do you know?? It is because of your mistakes that the battery of the spray pump is getting damaged...
Published on: 08 July 2025, 01:40 IST