Agripedia

शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य पिकवत असतो.

Updated on 01 January, 2022 4:20 PM IST

आणि भरघोस उत्पन्न होण्यासाठी रात्रं दिवस अपल्या शेतामध्ये राबत असतो पण भरघोस उत्पन्न जरी शेतकरी आपल्या शेतामध्ये घेत असतील तरी योग्य तो भाव शेतीमालाला मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आता प्रोसेसिंग ला महत्त्व दिले पाहिजे म्हणजे शेतकरी आपल्या शेतामध्ये तेलवर्गीय किंवा डाळवर्गीय व तसेच मसाल्याचे पिक असतात याची घरच्या घरी दाल मिल मधून बर्‍याचशा प्रकारच्या डाळी तयार करू शकतो तसेच तेलवर्गीय पिकांचे सुद्धा तेल घण्यातून काढू शकतो आणि मिरची पेस्ट तयार करू शकतो 

व पॅकिंग करून आपण बाजार भावात विकू शकतो 50 रुपये किलो तूर असते आणि ती जर डाळ करून विकली तर शंभर ते दीडशे रुपये किलो असा भाव भेटतो तसेच इतर मालाचे तेच असते भाव शेतीमालाला मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आता प्रोसेसिंग ला महत्त्व दिले पाहिजे म्हणजे शेतकरी आपल्या शेतामध्ये तेलवर्गीय किंवा डाळवर्गीय व तसेच मसाल्याचे पिक असतात याची घरच्या घरी दाल मिल मधून बर्‍याचशा प्रकारच्या डाळी तयार करू शकतो.

म्हणून शेतकऱ्यांनी डायरेक्ट मार्केटला माळ न विकता त्याची प्रक्रिया करून विकावे म्हणजेच आपल्या मालाला मोठ्या प्रमाणात भाव भेटेल अन्यथा शेतकरी वर्ग शेतीमालाची जोपासना व निगराणी राखतो आणि संपूर्ण वेळ आपल्या मुला बाळाप्रमाणे शेतमालाची जोपासना करत राहतो परंतु हीच काळजी आपण शेती माल विकण्यासाठी घेणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनो आता जागे व्हा आणि शेतीबरोबर शेती प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष द्या तुम्हा शेतकऱ्याला एक जोडधंदा तयार होईल

आणि तेव्हाच आपल्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल शेतकऱ्यांनो पिक्या तर आहात आता विक्या व्हा तेव्हा शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामाची किंमत या जगाला कळेल.         जय जवान ,जय किसान

 

गोपाल उगले

मो -9503537577

English Summary: Farmers Do concentrat on processing
Published on: 01 January 2022, 04:20 IST