Agripedia

ड्रॅगन फ्रुट हे मूळचे अमेरिकन फळ आहे. भारतात याला पिटाया या नावानेदेखील ओळखले जाते.

Updated on 27 April, 2022 9:11 AM IST

शेतकरी शेतातील उत्पादन चांगलं आणि भरघोस येण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. शिवाय पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीकडेही आजचा शेतकरी वर्ग वळला आहे. आधुनिक शेतीतून बऱ्याचदा कमी खर्चात अधिक उत्पादन आणि नफा देखील मिळतो आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच फळशेतीबद्दल सांगणार आहोत. सध्या बाजारात जास्त मागणी असलेले आणि तितकेच त्याच्या गुणधर्मामुळे लोकप्रियता मिळवलेले ड्रॅगन फ्रुट. या फळलागवडीला सध्या देश विदेशात बरीच मागणी आहे.

ड्रॅगन फ्रुट हे मूळचे अमेरिकन फळ आहे. भारतात याला पिटाया या नावाने ओळखले जाते. थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंका या देशात व्यापारी दृष्टिकोनातून ड्रॅगन फ्रुट या फळाची लागवड केली जाते. भारतातही गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यात तसेच महाराष्ट्रात कमी पावसाच्या भागात, सोलापूर, पुणे (शिरूर), सांगली येथेसुद्धा व्यापारी दृष्टिकोनातून या फळाची लागवड केली जाते.

या फळाची किंमत २०० ते २५० प्रतिकिलोपर्यंत आहे. त्यामुळे याची लागवड केल्यास उत्पन्न तर जास्त मिळेलच शिवाय आर्थिक लाभही यातून होऊ शकतो. या फळापासून अनेक उपपदार्थ देखील बनवले जातात. जसे की जॅम, आईस्क्रीम, जेली उत्पादन, फळांचा रस, वाइन इत्यादींमध्ये याचा वापर होतो. शिवाय त्वचेसाठी सुद्धा या फळाचा वापर केला जातो. फेस पॅक मध्ये त्याचा वापर केला जातो त्यामुळे या फळाच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते.

या फळाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याचा औषध म्हणून देखील वापर होतो. मधुमेह,कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये फॅट आणि प्रोटिनचे प्रमाणही खूप जास्त असल्यामुळे सांधेदुखीचा आजारही दूर होतो. हृदयाशी संबंधित आजार दूर करण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. शिवाय रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवण्यास आणि व पांढऱ्या पेशीही वाढवण्यास देखील हे फळ मदत करते.

ड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी सुपीक जमीन लागते शिवाय जमीन ही निचऱ्याची असते कारण पाणी साचलेल्या जमिनीत अनेक रोग निर्माण होऊ शकतात. त्या सुपीक जमिनीचा ph हा ६ आणि ७ च्या दरम्यान असतो. या फळ लागवडीसाठी उष्णकटिबंधीय वातावरण लागते. पारंपरिक शेतीतून बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थिति ओढवल्यास श्रम आणि आणि आर्थिक नुकसान होते अशावेळी कमी खर्चात अधिक फायदा देणारे ड्रॅगन फ्रुट ची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या;
सावधान! 'हा' काळ सर्पदंशाचा
ऐका बुलडोझरची कहानी! काय आहे बुलडोझरचे खरे नाव आणि केव्हा झाले पहिल्यांदा हे यंत्र तयार?
कृषिमंत्री दादाजी भुसे यांची कौतुकास्पद 'दादागिरी'!! दादांनी जुगार अड्डा केला उध्वस्त….. 

English Summary: Farmers cultivate Pitaya fruit which is profitable, many have earned millions.
Published on: 26 April 2022, 11:49 IST