Agripedia

हा लेख गरीब, काबाडकष्ट करून किंवा इतरांच्या शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी

Updated on 24 April, 2022 10:41 PM IST

हा लेख गरीब, काबाडकष्ट करून किंवा इतरांच्या शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी व त्यांच्या मुलांसाठी नाही.चोवीस तास राजकारणाच्या नशेत असलेल्या युवकांनो.कोणाचंही सरकार असलं तरी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, अशी बोंब ऐकायला मिळते

सर्व पक्ष सत्तेवर येवून खुर्ची गरम करून गेले, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं गाजरं ठरलेली आहेत.मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे हे अपवाद सोडले तर महाराष्ट्रात सर्व मुख्यमंत्री शेतकऱ्यांची मुलंच झालेले दिसतात.वसंतराव नाईक सोडले तर एकाही मुख्यमंत्र्याने भरीव कामगिरी केलेली दिसत नाही.

सर्व शेती मंत्री शेतकऱ्यांची मुलंच झालेली दिसतात.पाटबंधारे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांची मुलं किंवा शेतीशी संबंधित आहेत.

मग, मुख्य अडचण कुठे आहे?

जागतिक पातळीवर Weather Warfare Strategy चा वापर केला जात आहे.कृत्रिम पाऊस पाडणे, हवामानात मानवनिर्मित संसाधनांचा वापर करून बदल करणे, अचानक भूकंप घडवून आणणे, त्सुनामी लाटा निर्माण करण्यासाठी समुद्रात विशिष्ट ठिकाणी स्फोट घडवून आणणे, गारांचा अचानक पाऊस पाडणे

आकाशात ढगांची रेलचेल नसताना अचानक वीजा चमकणे.या व अशा घटनांच्या मागे एक व्यवस्था कार्यरत आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांचं तिकडे लक्षच नाही

दिवसभर राजकारण करत बसायचं. अभ्यास करायचा नाही. वैज्ञानिक विचार करायचा नाही. बुध्दीला गंज चढला तरी तीला साफ करण्याचा प्रयत्न केला जात नाही. जात, धर्म, पक्षीय राजकारण आणि विरोधाला विरोध करणे, या व्यतिरिक्त विचारच केला जात नाही. 

WhatsApp वरचे ऋषीमुनी, विचारवंत आणि पदवीधर कशी एकमेकांची जिरवली, या थाटात मिरवत आहेत.ज्येष्ठ शेतकरी पारंपरिक शेती शिवाय विचार करू शकत नाहीत आणि तरूण शेतीकडे ढुंकूनही पाहत नाहीत.

शेती विषय घेऊन पदवीधर झालेले १० टक्के लोकं नवीन मार्गाने वाटचाल करत आहेत. परंतु ९० टक्के पदवीधर.त्याचं ज्ञान वाढलं परंतु अज्ञान दूर झालं नाही.

एक अमेरिकन विचारवंत, भारतीय लोकांच्या हातात वैज्ञानिक साधनं उपलब्ध असूनही प्रगती का करू शकत नाही, याबाबत बोलतो.

A fool with a tool is still a fool.

सावधान मित्रांनो.

 

गणेश आष्टेकर 

डोंबिवली

English Summary: Farmer's boy concentrate on this things
Published on: 24 April 2022, 10:37 IST