Agripedia

ग्रामीण अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी शेतकरी महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन अधिक नफा मिळू शकेल.

Updated on 21 August, 2022 4:41 PM IST

ग्रामीण अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी शेतकरी (farmers) महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकार (government) नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन अधिक नफा मिळू शकेल.

मात्र शेतीमध्ये चांगले उत्पादन (production) काढायचे असेल तर शेतकऱ्यांना तितकी मेहनतही घ्यावी लागते. शेतीसोबतच अनेक प्रकारचे शेती स्टार्टअप सुरू करून किंवा शेती व्यवसाय करून चांगले उत्पादन मिळू शकते.

अशा प्रकारे केल्यास लागवडीचा खर्च (Cost of cultivation) कमी होऊन शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढू शकते. या उपक्रमामुळे गावातील इतर लोकांनाही रोजगार मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. शेतकरी शेतीमध्ये करू शकणाऱ्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.

निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला स्थगिती, शेतकऱ्यांना तात्पुरती मलमपट्टी?

वर्मी कंपोस्ट युनिट

सध्या रसायनांनी नष्ट होणारी माती वाचवण्यासाठी सेंद्रिय शेतीला (Organic farming) प्रोत्साहन दिले जाते, परंतु सेंद्रिय खताच्या अभावामुळे अनेक शेतकरी पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी रसायनांवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची आणि शेतांची ही गरज भागवण्यासाठी शेतकरी वर्मी कंपोस्ट युनिट उभारू शकतात.

या व्यवसायाच्या मदतीने शेतकरी आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच गांडूळ खताची विक्री (Sale of vermicompost) करून लाखोंचा नफा सहज कमवू शकतात. या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकार चांगल्या दराने कर्ज, सबसिडी आणि आर्थिक अनुदान देखील देते.

डेअरी फार्म

देशाची लोकसंख्या आहे त्यामुळे दुधाची आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांची मागणीही सातत्याने वाढत आहे. याचा फायदा शेतकरी करून घेऊ शकतात. शेतकरी शेती करताना 8 ते 10 जनावरे घेऊन डेअरी फार्म व्यवसाय (Dairy farm business) सुरू करू शकतात.

या व्यवसायामुळे जनावरांकडून मिळणारे दूध बाजारात चढ्या भावाने विकले जाईल आणि चांगले उत्पन्न मिळेल. शेणाचा वापर सेंद्रिय खत म्हणून शेतात केला जाईल आणि शेतातूनच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करता येईल.

शेतकऱ्यांनो पैसा कमवायचा ना? मग मांस उत्पादनासाठी अव्वल ठरणाऱ्या 'या' शेळीचे पालन करा

बेकरी आणि मिल व्यवसाय

शहरांमध्ये बेकरी उत्पादनांपासून ते तृणधान्ये आणि त्यांच्या पिठांना खूप जास्त मागणी आहे. हा व्यवसाय माणसाच्या मुलभूत गरजांमुळे कधीच तोट्यात जाणार नाही. चांगला नफा मिळू शकतो.

विशेषत: आजच्या काळात लोक आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय आणि शुद्ध उत्पादनांची मागणी करतात. अशा परिस्थितीत, पौष्टिक धान्य, कडधान्ये आणि त्यांचे पीठ बनवण्याचे युनिट एकत्र करून बेकरी व्यवसाय (Dairy farm business) करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या 
व्यवसाय करायचाय पण भांडवल नाही बोलणारांसाठी ही बातमी! आता शेळी पालनासाठी मिळणार 4 लाख रुपये...
LIC आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा रिटर्न; वाचा सविस्तर
'या' योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा रिटर्न; वाचा सविस्तर

English Summary: Farmers 3 businesses agriculture millions
Published on: 21 August 2022, 04:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)