शेतकऱ्यांना शेती आणि तत्रंज्ञान शिकण्याची गरज आहे. जेणेकरून उत्पादनात वाढ होईल आणि अधिकच नफा मिळवता येईल. आपण आज उत्पादनात वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत.
सध्या वाढते प्रदूषण तसेच सर्वच गोष्टींमध्ये होत असलेली भेसळ पाहता सर्वांनाच ताजा, उत्तम प्रतीचा भाजीपाला मिळावा अशी अपेक्षा असते. तर तुम्ही यासाठी स्वतः भाजीपाला लागवड करू शकता. त्यासाठी जास्त प्रमाणात जमीन पाहिजे असं काही नाही तर तुम्ही अगदी थोड्या जमिनीमध्ये देखील याची लागवड करून अधिक उत्पादन मिळवू शकता.
बियाणे सुरुवातीलाच तयार केल्यास उगवण आणि लवकर वाढीच्या अवस्थेदरम्यान झाडाला येणाऱ्या धोक्यांवर प्रभावी लस म्हणून काम करते.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित आहार आवश्यक
पिकांना पोषण देतांना डीएपी चा वापर करत असतांना आवश्यक असणाऱ्या इतर सूक्ष्म पोषक तत्वांकडे देखील लक्ष दिले पाहिजे. यांची आवश्यकता कमी प्रमाणात असली तरी चांगले पीक मिळवण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे.
या सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये प्रामुख्याने झिंक, बोरॉन इत्यादी असतात आणि ते जमिनीची सुपिकता करतात. ही अत्यावश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवण्याव्यतिरिक्त, आपल्याला फायदेशीर असलेल्या विविध पौष्टिक उत्पादनांबद्दल देखील स्पष्ट असले पाहिजे.सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवतांना योग्य उत्पादन योग्य प्रमाणात वापरणे गरजेचे आहे.
मुळे मजबूत असतील तर ते पिकांचा चांगला आधार बनतात
पिकांना मजबूत रूट सिस्टम विकसित करण्यास मदत करण्यासाठी गिबेरेलिक ऍसिड उत्तम ठरते. पिकांसाठी मुळे मजबूत असणे गरजेचे आहे. कारण मुळे पोषक तत्वांना कार्यक्षमतेने शोषून घेण्यास मदत करते. तसेच त्याची उत्पादन क्षमता वाढवते.
झाड मजबुतीने उभे असेल तर फुलांच्या संख्येत वाढ होते. तसेच अनेक आजारणापासून दूर राहण्यास मदत होते. तुम्ही गिबेरेलिक अॅसिड असलेली प्रमाणित उत्पादने वापरू शकता जसे की सेफेक्सचे ग्रेट एक्सपर्ट जे पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी मदत करू शकतात.
कीटक व्यवस्थापन
किडींवर प्रतिबंध घालण्यासाठी निरीक्षण करणे गरजेचे आहे. या विषयांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही Safex या अग्रगण्य भारतीय कृषी-रासायनिक उपक्रमाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. प्रत्येक दर्जेदार उत्पादन केवळ शिफारस केलेल्या प्रमाणात सानुकूलित करणे देखील आवश्यक आहे.
तुम्हाला उत्तम निकाल मिळवण्यासाठी अगदी शेवटपर्यंत निर्देशन ऐकणे गरजेचे आहे. कधीही लवकर केलेले नियंत्रण हे उशिरा उपाय योजना करण्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरते.
तज्ञांचा सल्ला घेणे कधीही चांगले
तुम्हाला कोणत्याही गोष्टीची शंका येत असेल तर कृषी क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे नेहमी चांगले आहे. जेणेकरून तुमच्या शंका दूर होण्यास मदत होईल. त्यांच्या मार्गदर्शनानंतर तुम्हाला शेती संबंधित अनेक नवीन उपाययोजना माहिती होतील.
हे तज्ञ विविध प्रकारच्या शेतीशी संबंधित समस्यांवर मौल्यवान सल्ला देऊ शकतात जसे की अनाकलनीय वनस्पती रोग किंवा अज्ञात पीक कीटक ज्यामुळे तुमची शेती धोक्यात येऊ शकते.
आलटून पालटून पीक घेणे ही एक मोठी गुरुकिल्ली
आलटून पालटून पीक घेणे म्हणजेच पीक रोटेशन हे अत्यंत महत्वाचे आहे. हे मातीला जिवंत ठेवण्याचे काम करते. एकाच पीक सतत घेतल्यास मातीवर अतिरिक्त दबाव पडतो. तर पीक रोटेशन केल्यास जमिनीस श्वास घेण्यास मदत होते.
काही पिके ही मातीमधील पोषक तत्वे शोषून घेतात तर काही पिके अशी आहेत जी पोषक तत्वांना जोडतात. विविध पिकांच्या लागवडीसाठी पोषक तत्वांनी युक्त माती-बेड तयार करण्यासाठी दोन्ही पैलूंचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. पीक रोटेशन मातीस योग्य पोषण देण्यास मदत करते.
Published on: 11 April 2022, 01:01 IST