Agripedia

पिकांच्या वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करत असतात. मात्र पिकांना खते देण्यापूर्वी शेतकऱ्यांना काही गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. या गोष्टींबाबद आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Updated on 18 August, 2022 4:33 PM IST

पिकांच्या वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी (farmers) मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करत असतात. मात्र पिकांना (crops) खते देण्यापूर्वी शेतकऱ्यांना काही गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. या गोष्टींबाबद आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सध्या बाजारात नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म मूलद्रव्य यांचे घटक असलेली पाण्यात विरघळणारी खते उपलब्ध आहेत. गरजेनुसार व मात्रा ठरवून ही खते (fertilizers) ठिबक संचातून देणे योग्य आहे. ही खते दररोज आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांनी द्या. याने पिकांमध्ये फरक जाणवेल.

'फर्टिगेशन' म्हणजे नेमके काय ?

शेतकरी मित्रांनो पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये द्रवरूप स्वरूपात म्हणजेच विद्राव्य खतांमधून पिकाच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या क्रियेला 'फर्टिगेशन' (Fertigation) म्हणतात. यात खताची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते.

यामुळे खताची कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन (Quality product) मिळण्यास मदत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार विद्राव्य खतांचा वापर करताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

पीएम किसान योजनेबाबद महत्वाची बातमी; पती-पत्नीला लाभ मिळण्यासंदर्भात नवीन नियम लागू

अशी काळजी घ्या

अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड, कॅल्शियम नायट्रेट आणि युरिया ही पाण्यात विरघळणारी नत्रयुक्त खते बाजारात उपलब्ध असतात. पिके नायट्रोजन नायट्रेट (Nitrogen nitrate) रूपात घेतात. अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराइड यातील नत्र थोड्या वेळातच नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होते.

परंतु या खतामुळे ( fertilizers) जमिनीतील आंमलता वाढते. त्यामुळे जमिनीचा सामू कमी होतो. परिणामी कालांतराने जमीनी नापीक बनतात. अशा जमिनी सुधारण्यासाठी चुना वापरावा लागतो. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात वापरावीत. कॅल्शियम नायट्रेट व सोडियम नायट्रेट यांच्या वापरामुळे जमिनीतील क्षार वाढून जमिनी खारवट होतात.

अशा जमिनी सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा (organic fertilizers) मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. त्यामुळे ही खते पाण्यात विरघळून सुद्धा ठिबक संच्यात वापरता येत नाहीत. खतांचा वापर कसा केला पाहिजे. याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.

आता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार; शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने घेतला 'हा' मोठा निर्णय

स्फुरदयुक्त खतांचा वापर असा करा

सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपी, बोन मिल व रॉक फॉस्फेट हे प्रकार आहेत. यातील बोन मिल व रॉक फॉस्फेट हे अविद्राव्य आहेत. सुपर फॉस्फेट (Super phosphate) हे सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट या तीन प्रकारात मिळते. सुपर फॉस्फेट पाण्यात विरघळते परंतु त्याची विरघळण्याची क्रिया फार हळू आहे. त्यामुळे ठिबक सिंचनातून हे खत देणे त्रासाचे असते.

त्यामुळे स्फुरदाची मात्रा फॉस्फोरिक ऍसिड (Phosphoric acid) मधून देतात. ठिबक संचातून युरिया व सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण देणे अपायकारक आहे. कारण असे मिश्रण एकत्र दिल्यास सुपर फॉस्फेट चे रूपांतर फॉस्फोरिक ऍसिड मध्ये होते व ते वायुरूपी असल्यामुळे संचाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

महत्वाच्या बातम्या 
Walnut Cultivation: अक्रोडाच्या लागवडीतून शेतकरी होतील करोडपती; जाणून घ्या संपूर्ण पद्धत
शेतकऱ्यांना 'या' योजनेतून मिळणार 65 हजार मानधन; अंतिम मुदत 22 ऑगस्ट, त्वरित घ्या लाभ
Agriculture Cultivation: 'या' शेतीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मिळेल बंपर नफा; जाणून घ्या सविस्तर

English Summary: Farmer using fertilizers Otherwise big loss
Published on: 18 August 2022, 04:22 IST