Agripedia

शेतीमध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान आले असून शेतकरी नवनवीन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादन वाढीकडे लक्ष देत आहेत. आता आपल्याला सगळ्यांना पॉलिहाऊस हे तंत्रज्ञान माहिती आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेतलेले उत्पादन हे नक्कीच जास्त असते.परंतु या पॉलिहाऊसशी संबंधित तंत्रज्ञान लुधियाना येथील केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील प्रो.डॉ. हरीश हिराणी यांनी पॉलिहाऊस साठी रिफ्रॅक्टेबल स्वरूपाचे छत विकसित केले असून ते हवामानाची स्थिती ओळखून आणि पिकांची गरज नेमकी काय आहे हे ओळखून स्वयंचलित कार्यरत असते.

Updated on 15 August, 2022 4:12 PM IST

यामध्ये एक पीएलसी  नावाचे सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला असून त्या माध्यमातून हवामानाची स्थिती आणि पिकांना कशाची गरज आहे,

त्या संबंधित घटकांची उपलब्धता केली जाईल.या तंत्रज्ञानामध्ये नैसर्गिक वातावरण आणि पारंपारिक हरित गृहातील जे काही उपयुक्त घटक आहेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नक्की वाचा:भावांनो! नेमके काय आहे 'सीड ड्रिल मशीन'? वाचा त्याची किंमत आणि उपयोग

काय नेमके हे तंत्रज्ञान?

 हे जे पॉलिहाऊस वरील छत विकसित करण्यात आले आहे ते अंशतः किंवा पूर्णतः उघडता किंवा बंद करता येते. त्यामुळे मधील वातावरणात शुद्ध हवा किंवा सूर्यप्रकाशाची गरज असेल तर त्यानुसार ते पूर्णपणे उघडले जाऊ शकते.

हवामानातील बदलांमुळे जे काही पिकांचे उत्पादन व दर्जा यावर परिणाम होतो तो या तंत्रज्ञानामुळे होणार नाही.याला बाजूला झडपा देण्यात आले असून त्यांच्या साहाय्याने आतील आद्रतेचे प्रमाण योग्यरीत्या ठेवता येईल पिकांची वाढ देखील योग्य रित्या करून घेता येईल.

नक्की वाचा:Agricultural Technology: आता फोनवर उपलब्ध होणार कृषी उपकरणे; नवीन ॅप लॉन्च

 या तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना होणारे फायदे

1- या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी बांधव हंगामी आणि बिगरहंगामी असे वर्षभर पिकांचे उत्पादन घेऊ शकतात.

2- यामध्ये तुलनेने पिकांचे उत्पादन जास्त मिळते व कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो त्यामुळे खर्चात बचत होते.

3- पॉलिहाऊस मधील हवामान पिकांच्या वाढीसाठी अधिक उत्तम पद्धतीने नियंत्रित केली जात असल्यामुळे उत्पादनात दर्जेदार वाढ होते.

4- यामध्ये हवामान नियंत्रण व बरीच कामे हे ऑटोमॅटिक पद्धतीने होत असल्याने मजुरांची गरज नसते व मजुरांवरील खर्च देखील वाचतो.

5- विविध पिकांच्या रोपवाटिकेसाठी तंत्रज्ञान खूपच लाभदायी सिद्ध होईल.

6- यामध्ये सगळे भाजीपाला वर्गीय पिके घेता येणे शक्य आहे.

नक्की वाचा:Water Soluble fertilizer: फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा वापर ठरेल पिकांसाठी महत्वाचा, मिळेल भरघोस उत्पादन

English Summary: farmer take crop production of unseasonable crop with this technology
Published on: 15 August 2022, 04:12 IST