Agripedia

सध्या देशभरात सेंद्रिय शेतीचे (Organic farming) विविध प्रयोग सुरू आहेत.

Updated on 24 January, 2022 7:18 PM IST

सध्या देशभरात सेंद्रिय शेतीचे (Organic farming) विविध प्रयोग सुरू आहेत. रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने लोकांच्या व शेतीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे घटक असल्याने सेंद्रिय शेतीवर जास्त भर दिला जातोय. अशातच मध्यप्रदेश येथील जबलपूर मधील शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीमधून ४०० रुपये किलोचा टोमॅटो पिकवला आहे.

जबलपूर मधील अंबिका पटेल या शेतकऱ्यांने पॉलिहाऊस मध्ये या नव्या वाणाच्या टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. हा टोमॅटो चेरीसारखा दिसत असून १२ महिने या टोमॅटोचे उत्पादन सुरूच असते. हे टोमॅटो आकाराने लहान असतात व इतर टोमॅटोंच्या तुलनेत ते आंबट देखील असतात. या टोमॅटोसाठी भरपूर ठिकाणांहून मागणी (Demand) येत असून याची पॅकिंग ही निराळ्या पद्धतीने केली जाते.

चेरी पद्धतीच्या या टोमॅटोमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त आशा खालील गोष्टी आहेत

१) या टोमॅटो मधून उच्च जीवनसत्व मिळतात.

२)यामध्ये प्रोटीन (Protein)आणि फायबर्स चे प्रमाणही जास्त आहे.

३) सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यामुळे कोणत्याही विषारी रासायनिक घटकांचा धोका नाही

४) शरीरास आवश्यक पोषकतत्त्वे (Nutrients)यात उपलब्ध आहेत.

या कारणांमुळे या मध्यप्रदेश मधील शहरांमध्ये या टोमॅटोच्या मागणी मध्ये वाढ (Growth) होताना दिसून येत आहे.

हा टोमॅटो चेरीसारखा दिसत असून १२ महिने या टोमॅटोचे उत्पादन सुरूच असते. हे टोमॅटो आकाराने लहान असतात व इतर टोमॅटोंच्या तुलनेत ते आंबट देखील असतात. या टोमॅटोसाठी भरपूर ठिकाणांहून मागणी (Demand) येत असून याची पॅकिंग ही निराळ्या पद्धतीने केली जाते.

English Summary: Farmer take 400 rs kg organic tomato
Published on: 24 January 2022, 07:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)