Agripedia

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. आता किमान आधारभूत किमतीबाबद सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Updated on 20 August, 2022 3:24 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक दिलासा मिळतो. आता किमान आधारभूत किमतीबाबद सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

किमान आधारभूत किंमत (Minimum base price) हा शेतकर्‍यांसाठी नेहमीच मोठा आणि महत्वाचा मुद्दा राहिला आहे. २२ ऑगस्ट रोजी पिकांच्या एमएसपीबाबद एक मोठी बैठक होणार आहे.

अशा परिस्थितीत ही शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी मानली जात आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा मिळणारा निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Animal Husbandry: पशुपालकांनो शेेळ्या-मेंढ्यांची 'अशी' काळजी घ्या; पशुसंवर्धन विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना

सर्वाचे या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे. कारण या बैठकीत कोणताही निर्णय झाला किंवा कोणतीही चर्चा झाली तर त्याचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर होणार आहे. एमएसपी (Minimum base price) स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या या पहिल्या बैठकीचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.

परंतु माहितीनुसार या बैठकीत समितीचे सर्व सदस्य भविष्यातील रणनीतींवर चर्चा करणार आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने १८ जुलै रोजी एमएसपीशी संबंधित ही समिती स्थापन केली होती.

पीक विम्यासाठी सरकारकडून 19 कोटी 69 लाख रुपयांचा निधी; शेतकऱ्यांना होणार फायदा

केंद्र सरकारने (central government) वादात असलेले तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर ८ महिन्यांनी ही समिती स्थापन करण्यात आली. एमएसपीची अधिक प्रभावी आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण करणे हा या समितीचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकर्‍यांच्या नजरा एमएसपीवर होणाऱ्या या पहिल्या बैठकीकडे लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 
Agricultural Business; फक्त 3 महिन्यांत बंपर कमाई; 'या' वनस्पतीच्या लागवडीतून शेतकरी होणार करोडपती
'या' योजनेत फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करा; मॅच्युरिटीनंतर मिळतील 16 लाख रुपये
पशुपालकांनो शेळीपालनासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; घ्या 'असा' लाभ

English Summary: Farmer Income Fair price farmers crops meeting August 22
Published on: 20 August 2022, 03:18 IST