बदलत्या जागतिक परिस्थितीत "शाश्वत शेती व संपन्न शेतकरी" संकल्पना जोपासत वैश्विक पटलावर सर्वाधिक लोकसंख्यांक होऊ पाहणाऱ्या आपल्या देशातील जनतेला दोन वेळचे सकस अन्न उपलब्ध करून देण्यासाठीचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अवलोकन करता यावे तसेच अत्याधुनिक शेती तंत्र आत्मसात करीत फायद्याच्या शेतीचे अनेक अनेक पैलू प्रत्यक्ष बघता यावे व शास्त्रज्ञासोबत चर्चेद्वारे शेतीविषयक शंका
समाधान करता यावे या हेतूने विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत आयोजित तीन दिवसीय A three-day event was organized to mark the foundation day of the university शिवार फेरीत सहपरिवार
फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर सेल सुरू, अर्ध्या किंमतीत खरेदी करा टीव्ही आणि बरच काही
सहभागी होत या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले आहे.विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनायद्वारे आयोजित शिवार फेरीचे आढावा सभेच्या प्रसंगी बोलताना डॉ. गडाख यांनी अधिकाधिक शेतकरी बंधू भगिनीनी शिवार फेरीत सहभागी होण्यासाठी कृषि विभाग व इतर संस्थानी देखील प्रयत्न करावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. मंगळवार दिनांक 18
ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर दरम्यान आयोजित शिवार फेरीचे दरम्यान प्रत्येक विभागातील व प्रक्षेत्रावरील तयारीचा आढावा कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेत शेतकरी सदन येथील कृषिजगार सभागृहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण तथा आयोजक डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषि डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, यांचे सह विद्यापीठ अभियंता श्रीमती रजनी लोणारे,
कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, यांचे सह सर्व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख,शिवार फेरीसाठी गठीत सर्व समित्यांचे अध्यक्ष, सदस्य आणि सचिव व विस्तार शिक्षण संचालनालयातील अधिकारी कर्मचारी आदिची उपस्थिती होती.या तीन दिवसीय शिवार फेरीचे उद्घाटन मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता शेतकरी सदन येथे संपन्न होणार असून शेतकरी बांधवांची नोंदणी नंतर विद्यापीठाचे वाहनाद्वारे विविध प्रक्षेत्र व संशोधन विभागाना प्रत्यक्ष भेटी देण्याची
संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध झाली असून शेतकरी बांधवांचे स्वागतासाठी विद्यापीठ सज्ज असल्याचे संचालक विस्तार शिक्षण तथा आयोजक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी नमूद केले. व या शिवार फेरीचे निमित्ताने शेतकरी बंधू भगिनींना आपल्या शेतीविषयक समस्यांचे तज्ञांकडून वेळीच करण्याची ही सुवर्णसंधीच आहे. विदर्भासह राज्यातील सर्वच विभागातील शेतकरी बंधू भगिनींनी या शिवार फेरीचा लाभ घ्यावा व येणारा हंगाम यशस्वी करावा असे आवाहन देखील विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी या प्रसंगी केले.
Published on: 18 October 2022, 02:59 IST