महाराष्ट्र मध्ये फॉल अर्मीवर्म हि आळी मका,ऊसइत्यादी पिकांवर हल्ला करीत असून दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे. त्या अळीचे वेळीच सावध होऊन एकात्मिक कीड नियंत्रण करणे फार महत्त्वाचे आहे. सन 2018 मध्ये तिचा भारतात सर्वप्रथम भारतात प्रादुर्भाव दिसून आला. या लेखात आपण लष्करी अळी एकात्मिक व्यवस्थापन आणि तिची आर्थिक नुकसानीची पातळी कशी ओळखायची याबद्दल माहिती घेणार आहोत.
मक्यावरील लष्करी अळीची आर्थिक नुकसान संकेत पातळी
- मका पिकाची रोप आवस्थाते सुरुवातीची पोंगा अवस्थेमध्ये तीन पतंग प्रति सापळा किंवा पाच टक्के प्रादुर्भावित झाड
- सुरुवातीची असलेली पोंगा अवस्था ते मध्य पोंगा अवस्था ( उगवणीनंतर दोन ते चार आठवडे )- पाच ते दहा टक्के प्रादुर्भावित झाडे
- मध्य पोंगा अवस्था ते उशिराची पोंगा अवस्था( उगवणीनंतर चार ते सात आठवडे )- 10 ते 20 टक्के प्रादुर्भावित झाडे
- उशिराची पोंगा अवस्था( उगवणीनंतर सात आठवड्यांच्या पुढे )- 20 टक्क्यांपेक्षा जास्त प्रादुर्भावीतझाडे
- तुरा लागण्याची अवस्था ते पिक काढणे – दहा टक्क्यांपेक्षा जास्त कणसाची नुकसान
मका पिकावरील लष्करीअळीचे एकात्मिक नियंत्रण
- पाऊस पडण्याआधी खोल नांगरट करून घ्यावी. त्यामुळे किडीची कोषावस्था प्रकार सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येऊन तसेच पक्षाच्या संपर्कात येऊन मरून जाते.
- पीक फेरपालट, मका घेतलेल्या शेतात भुईमूग सूर्यफूल घ्यावे.
- मका पिकाचे उशिरा पेरणी टाळावी. पेरणी पाऊस पडल्यानंतर करावी.
- एकाच वेळी पेरणी केल्यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो. किडीला प्रत्येक वाढीच्या अवस्थेतील मका उपलब्ध होतो.
- आंतरपीक घेऊन पिकांची विविधता साधावी.
- मका पिकाच्या अवतीभवती सापळा पीक म्हणून नेपिअर गवताची लागवड करावी.
- मक्याची पेरणी झाल्यानंतर एकरामध्ये दहा पक्षी थांबे उभारावेत.
- मक्याच्या पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरूवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट करावीत.
- मका पिकाच्या लागवडी नंतर किडीच्या निरीक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.
- नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी 15 कामगंध सापळे लावावेत.
- पोंगाव्यवस्थित तयार होईल त्यावेळी माती आणि राख किंवा चुना यांचे 9:1 या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यात टाकावे. त्यामुळे होते असे की पोंग्यातीलअळ्यावर परिणाम होतो.
- या अळीचा प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई तीन ग्रॅम किंवा मेटारायझियमऍनिसोप्लिपाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यास शिफारशीत कीडनाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी.फवारणी करताना द्रावण मका पिकाच्या पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी.
Published on: 17 October 2021, 10:53 IST