Agripedia

सध्या फसवणुकीचे प्रमाण वाढतच चालले आहे. अधिक नफ्यासाठी बाजारपेठेत नकली आले विकून व्यापारी चांगला पैसा कमवत आहेत. डोंगरी झाडाची मुळे आल्याच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. त्यामुळे व्यापारी ही मुळे आले म्हणून विकून लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.

Updated on 09 October, 2022 11:27 AM IST

सध्या फसवणुकीचे प्रमाण वाढतच चालले आहे. अधिक नफ्यासाठी बाजारपेठेत (marketplace) नकली आले विकून व्यापारी चांगला पैसा कमवत आहेत. डोंगरी झाडाची मुळे आल्याच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. त्यामुळे व्यापारी अशी मुळे आले म्हणून विकून लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.

हुबेहूब आल्यासारखी दिसणाऱ्या औषधी वनस्पती (Medicinal plants) अधिक नफ्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजारात विकायला सुरुवात केली आहे. आले एक असे आयुर्वेदिक औषध आहे जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच शरीराला अनेक रोगांशी लढण्याची ताकद देखील देते.

LIC ने लॉन्च केली सर्वोत्तम पॉलिसी; वयाच्या 40 व्या वर्षी मिळणार 50 हजार रुपये पेन्शन

डोंगरी झाडाची मुळे अद्रकापेक्षा खूपच स्वस्त आहेत. त्यामुळे ते अधिक नफ्यासाठी बाजारात विकले जात आहे. बाजारात जास्त नफा मिळत असल्याने आता काही लोकांनी लागवड करण्यास सुरुवात केली आहे. विक्रेत्यापासून एजंटपर्यंत (agent) ते कच्चे आले म्हणून विकत आहेत.

जर तुम्ही बाजारातून आले विकत घेणार असाल तर तुम्ही देखील योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. येथे आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही खरे आणि नकली आले सहज ओळखू शकणार आहात.

महत्वाची बातमी! IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती केल्या जाहीर

या गोष्टी लक्षात ठेवा

आले खरेदी करताना आल्याच्या आत असलेली जाळी आणि फायबर लक्षात ठेवा. खरेदी करताना नुसते थोडे आले तोडून जाळी आणि फायबर (fiber) ओळखले जातात. आले खरेदी करताना लक्षात ठेवा की आल्याचा वरचा थर पातळ असावा, त्यात नखे घातल्यास थर कापला जाईल.

त्यानंतर वास घ्या आणि त्यात तिखट सुगंध आहे की नाही ते तपासा. जर सुगंध तिखट असेल तर आले खरे आहे आणि जर नसेल तर समजा तुम्हाला आल्याऐवजी दुसरे काहीतरी विकले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वाटप
पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून आज 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
मिथुन, मीन, कन्या राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी; नशिबाचीही साथ लाभणार

English Summary: Fake ginger would you Identify genuine fake ginger
Published on: 09 October 2022, 11:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)