नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं वाचाल तर वाचाल EPN किटकभक्षी सूत्रकृमी. *EPN (Entomo Pathogenic Nematodes) यावर्षी दुष्काळी परिस्थिती मुळे रब्बी पेरणी अत्यल्प झाली आहे.
परंतु सततच्या ढगाळ हवामानामुळे सर्वच पिकांमध्ये विशेषत: मका, ज्वारी, हरभरा, सर्व भाजीपाला व फळपीकांवर विविध अळींचा प्रादुर्भाव दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी फवारणी केली असता त्यांना याचे फारच चांगले परिणाम मिळाले आहेत. आपणही विषमुक्त अन्नाचे उत्पादन करू शकतो हा विश्वास यातुन मिळत आहे EPN हे एक प्रकारचे सूक्ष्मजीव असून ते किटकभक्षी आहेत.
हे निसर्गात व जमिनीत काही प्रमाणात आढळतात पण उत्कृष्ट कीड नियंत्रणासाठी त्यांना प्रयोगशाळेत वाढवून पिकांवर किंवा जमिनीत फवारणी द्वारे सोडावे लागते।
EPN ची बाल्यावस्था (Juvenile) ही आपल्या EPN च्या पावडर मध्ये असते आणि ती 1 ग्राम मध्ये काही लक्ष इतकी जास्त असते ह्याची फवारणी केली असता हे EPN चे पिल्ले किडींचा अळ्यांचा शोध घेतात (वास घेऊन) व त्या किडीच्या शरीरात प्रवेश करतात।
ह्या सूत्रकृमी च्या शरीरात किटकला मारणारे जिवाणू असतात ते त्या किडीच्या शरीरात सोडून तिला ठार करतात वेळ 24 तास ते 48 तास
मेलेल्या कीटकाच्या शरीरात मग हे वाढ होऊन प्रौढ बनतात व तिथे अंडी घालतात। त्यानंतर अंड्यातून पिल्ले अवस्था (Juvenile) बाहेर येऊन ते दुसऱ्या कीटकाच्या (भक्ष्याच्या) शोधत जातात।
अश्याप्रकारे फक्त एक किवा दोन दिवसात उत्तम नियंत्रण मिळते।
हे EPN जिथे इतर औषधे पोहचू शकत नाहीत अश्या किडींच्या नियंत्रणात मदत करतात। उदा: बोण्ड अळ्या (गुलाबी बोण्ड अळी सुद्धा), वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी, इत्यादी।
कुठल्या किडीसाठी चालते?
सर्व प्रकारच्या अळ्या जसे
नक्की वाचा:कीटकनाशकांचे द्रावण तयार करणे महत्वाची पद्धत
हुमणी खोड किडा,ऊसावरील तीनही प्रकारच्या खोड किडी,केळीवरील कंद खाणारा भुंगा (Rhizome weevil)सर्व बोण्ड अळ्या, गुलाबी बोण्ड अळी,नाग अळी,वांग्यावरील शेंडा व फ़ळ पोखरणारी अळी, टामाट्यावरील फळ खाणारी अळी,घाटे अळी,तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी,
सोयाबीन वरील चक्र भुंग्याची अळी अवस्था,जमिनीतील मूळे खाणाऱ्या अळ्या,संत्रा किंवा इतर फळ पिकातील खोडकीडा,या किटकाचा कर्दनकाळवापर आवश्यक आहे
धन्यवाद
स्रोत-ओळख मित्र जिवाची
मिलिंद जि गोदे
9423361185
*Save the soil all together*
Published on: 17 April 2022, 01:13 IST