Agripedia

“आपल्याला नैसर्गिक शेतीला गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. रसायनमुक्त शेतीसाठी. आझादी का "अमृत महोत्सव" साजरा करताना आपण सर्वांना जोडले पाहिजे.

Updated on 19 January, 2022 11:17 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता .१८) भाजप कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे. ते नमो अँपद्वारे वाराणसीमधील भाजप कार्यकर्त्यांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आपल्याला नैसर्गिक शेतीला गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. रसायनमुक्त शेतीसाठी. आझादी का "अमृत महोत्सव" साजरा करताना आपण सर्वांना जोडले पाहिजे.

सेंद्रिय शेती ही पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या सेंद्रिय किंवा जैव निविष्ठांच्या वापरास प्रोत्साहन देणारी शाश्वत शेती पद्धती म्हणून ओळखली जाते. सेंद्रिय शेती मृदा संधारणासह ग्लोबल वार्मिंग कमी करण्यास देखील योगदान देते. "निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशात निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मोदींचा पक्ष कार्यकर्त्यांशी झालेला हा पहिलाच राजकीय संवाद आहे.

स्थानिक संसाधनाचा वापर करणारी, कमी भांडवली खर्चाची मूळ तत्त्वावर आधारलेली, सेंद्रिय पदार्थाचा सुयोग्य वापराने जमिनीची उत्पादनक्षमता वाढवून ती टिकवून धरण्यावर भर देणारी, जैविक विविधता जोपासणारी, शेतकरी कुटुंबाच्या पोषण विषयक व इतर मूलभूत गरजा पूर्ण करणारी निसर्ग पूरक स्वयंपूर्ण शेती पद्धती म्हणजेच ‘सेंद्रिय शेती” होय.

सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा वापरब केला जातो. सेंद्रिय शेती करण्यासाठी पूर्णता सेंद्रिय पदार्थाचा वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती करताना सर्वांत महत्त्वाचा घटक ‘सेंट्रिय कर्ब’ हा असतो.

सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीतील कुजलेला काडी-कचरा झाडाची पाने मुळे, प्राण्यांची विष्ठा इत्यादी. जमिनीत असंख्य सूक्ष्म जीवजंतू वास्तव करीत असतात. त्यात बुरशी, बॅक्टेरिया, अक्टीनोमायसिन या घटकांचा समावेश असतो. हे जीवजंतू सेंद्रिय पदार्थाचे विघटन दोन किंवा तीन अवस्थेत करतात. जसे एखादी गोष्ट जेव्हा मातीत कुजते तेव्हा त्याचे प्रथम रूपांतर सेंद्रिय कर्बामध्ये होते. आणि त्यानंतर त्याचे ह्युमसमध्ये रूपांतर होते. सेंद्रिय शेती करण्यासाठी सेंद्रिय खतांचा एकीकृत वापर करावा. याचे अनेक फायदे मिळतात.

English Summary: Encourage organic farming: PM Modi
Published on: 19 January 2022, 11:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)