ही द्रावणे सेंद्रीय शेतीमधील महत्त्वाचा घटक असून या द्रावणांचा शोध १९८० च्या सुमारास फलोत्पादन तद्न्य डॉ. टेरूओ हिगा यांनी युनिवर्सिटी ऑफ रायुक्युस, ओकिनावा, जपान येथे लावला. सद्यस्थितीत या द्रावणांचा संपूर्ण जगात वापर होत आहे. या द्रावणांमध्ये एकूण ८० जिवाणूंचा समावेश असला तरी यामध्ये प्रामुख्याने लैक्टिक एसिड बैक्टेरिया (Lactobacillus sp.), फोटोसिंथेटिक बैक्टेरिया (Rhodopseudomonas sp.) आणि यीस्ट (Saccharomyces sp.) या जिवांणूंचा समावेश असून ही द्रावणे मानव
प्राणी आणि निसर्गासाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले आहे. या द्रावणांचा वापर शेती, सेंद्रिय खतनिर्मिती, पशुपालन, कुक्कुटपालन, घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनामध्ये फायदेशीर दिसून आला आहे.
तसेच ही द्रावणे कीड आणि रोग समस्या टाळण्यासाठी सुद्धा वापरतात.जागतिक पातळीवर इम्रो (EMRO-EM Research Organization) नावाची संस्था अधिकृत ईएम द्रावण बनविते, तर २००१ सालापासून भारतात मँपल ऑर्गटेक लि., कोलकाता (Maple Orgtech Ltd., Kolkata) ही कंपनी अधिकृतरित्या जपानच्या तंत्रज्ञानाने ईएम द्रावणे तयार करत आहे. ईएम-१ या द्रावणासोबतच या कंपनीचे झाडांचे/पिकाचे किडींपासून रक्षण करण्यासाठी
- टर्मिन (Termin), संप्रेरके - प्राईमो (Primo) व प्लेंटी (Plentee), माती सुधारक - ईएम पॉवर (EM Power) व ईएम रिच (EM Rich) आणि खतानिर्मिती - बोकाशी (Bokashi), इत्यादी कार्यक्षम (एक्टीवेटेड) द्रावणेही बाजारात उपलब्ध आहेत. बोकाशी हे एक भूसा, गव्हाचा कोंड्यापासून बनविलेले कडक स्टार्टर आहे.
मूळ ईएम द्रावणामधील सूक्ष्यजीव जिवंत असले तरी ते सुप्त अवस्थेत असतात, त्यांना कार्यरत (एक्टीवेट) करण्यासाठी
व आर्थिक बचत करण्यासाठी दुय्यम द्रावणे तयार करतात. ही द्रावणे मूळ द्रावणाइतकेच परिणामकारक असतात. या द्रावणांचा कमी प्रमाणात परंतू नियमित वापर करावा.
जैविक शेतकरी
मिलीद गोदे, अचलपूर
Published on: 12 December 2021, 08:40 IST