Agripedia

चांगले उगवण क्षमतेचे, चांगल्या प्रतीचे आणि प्रमाणित बियाणे वापरा. आपल्या क्षेत्रानुसार शिफारशी केलेल्या वाणांचा वापर करा. वांगे हे कोरड्या आणि उष्ण हवामानात येणारे पीक आहे. ते 13 ° से पासून 21 ° से तापमानात घेतले जाते. वांगी पिकाला ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस मानवत नाही.

Updated on 19 October, 2021 8:13 PM IST

जमिनीची तयारी

चांगल्या वाढीसाठी व विकासासाठी पाण्याचा निचरा होणारी, सुपीक व मध्यम काळी जमीन निवडावी. प्रथम जमिनीची आडवी-उभी नांगरट व कुळवांच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

जाती

सुधारित जाती:अरुणा, मांजरी गोटा, पुसा पर्पल राऊंड, पुसा पर्पल क्लीस्टर, रुचिरा, प्रगती, पुसा पर्पल लॉंग, पुसा क्रांती. संकरीत जाती:हरित,कृष्णा आणि एमएच-10

बिज प्रक्रिया

पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3gm किंवा कार्बनडॅझिम (बाविस्टिन,सहारा) 1gm/kg ची प्रक्रिया करा. रासायनिक प्रक्रीये नंतर ट्रायकोडर्माची@5gm/kg प्रक्रिया करा. नंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणी करा. लागवडी आधी रोपांची VAM + नत्र स्थिरिकरण जीवाणू सोबत प्रक्रिया केली असता सुपर फॉस्फेटची 50% तर नत्राचि 25% बचतहोते.

पेरणी आणि लागवड पद्धती

वांग्याची लागवड तीनही हंगामात करता येते. उन्हाळी हंगामात बियांची पेरणी जानेवारीच्या दुस-या आठवड्यात करून रोपांची लागवड फेब्रुवारीत करावी. पावसाळी हंगामात बियांची पेरणी जुनच्या दुस-या आठवड्यात करून रोपांची लागवड जुलै-ऑगस्टमध्ये करावी. रब्बी किंवा हिवाळी हंगामात बियांची पेरणी सप्टेंबर अखेरपर्यंत करून रोपांची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करावी.

रोपवाटिकातयारी.

3x1 m आकाराचा व 10-15 cm उंचीचा गादी वाफा करून त्याच्याकडेने पाणी देण्यासाठी एक सरी करून घ्यावी. पुनर्लागवडीसाठी वांग्याच्या जातीनुसार व जमिनीच्या प्रकारानुसार दोन झाडातील व दोन रोपातील अंतर ठरवावे. भारीजमिनीसाठी 100x100,मध्यम जमिनीसाठी 75X75cm व हलक्या जमिनीसाठी 60X60cm किंवा 75X75cm अंतर वापरा.

रोपवाटिका व्यवस्थापन

लागवडीनंतर रोपांची पाने लहान होवू नये,तसेच बोकड्या रोग येवू नये म्हणून रोपवाटिकेत वाफ्यावर बी पेरताना 10%फॉरेट 20 gm/ 3 X 1m च्या वाफ्यात या प्रमाणात दोन ओळीमध्ये टाका. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी बी पेरल्यानंतर 2 आठवड्यांनी 20 मिली मॅलेथीऑन 50% किंवा 2.5 मिली फॉस्फोमीडॉन 85% किंवा डायमेथोएट 30% 10 मिली 10 लिटरपाण्यातून फवारा. बिज दर सुधारित जातीसाठी हेक्टरी 400-500 ग्रॅम व संकरित जातीसाठी हेक्टरी 120-150 ग्रॅम बी पेरणीसाठी लागते.

तण व्यवस्थापन तण नियंत्रण: 

लागवडी/पेरणीनंतर लगेच परंतु पिक उगवण्यापूर्वी पेंडीमिथालीन 30 EC (स्टॉंम्प,धानुटॉप)150ml/15Ltr पाण्यातून फवारा. उभ्या पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30-35 दिवसांनी एकदा कोळपणी करावी.

पीक-पोषण

सेंद्रीय खते, आणि जैविक खते 5-6 टन कुजलेले शेणखत प्रती एकर जमिनीच्या मशागतीच्या वेळेस द्यावे.

रासायनिक खते

चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया),20 किलो स्पुरद (125 किलो एसएसपी) व 20 किलो पालाश (34 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीपूर्वी सरीमध्ये टाकावे. चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया) प्रती एकर लागवडीनंतर 20 आणि 45 दिवसांनी द्यावे.

पाण्यात विरघळणारी खते

चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर 20-25 दिवसांनी 19:19:19 5gm/Ltr पाण्यातून फवारा. चांगल्या फुलधारणा व फळांचा विकास होण्यासाठी फुलो-यापूर्वी 19:19:19 5gm/Ltr आणि 0:52:34 5gm/Ltr पाण्यातून फळे तयार होताना फवारा.

सुक्ष्म अन्नद्रव्ये

लागवडीनंतर 10-15 दिवसात 19:19:19 आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. लागवडीनंतर 40-45 दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फुलोरा अवस्थेत असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम + मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फळ धारणा अवस्थेत असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम + बोरान 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फळ पोसत असतांना 13:0:45 4 ते 5 ग्रॅम + कॅल्शियम नायट्रेट 2 ते 2.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

अन्नद्रव्यांची कमतरता

लोह कमतरता. खालची पाने हिरवी, नवी पाने पांढरट दिसतात. नियंत्रण- चिलेटेड आयर्न एकरी 125-150 ग्रॅम 130 लिटर पाण्यातून फवारा संप्रेरके पिकाच्या प्राथमिक वाढीच्या काळात 1Ltr/acre ह्युमिक असिड किंवा 5 kg/acre ग्रॅन्युअल्स वापरल्यास त्याचा पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी एकरी ट्रायकोन्टनल होर्मोन 500 ppm हे 200Ltr पाण्यातून 100ml इतक्या प्रमाणात 15दिवसांच्या अंतरा ने 2-3 वेळा फवारा.

सिंचन

सिंचन वेळापत्रक उन्हाळी हंगामात पिकाला 5-6 दिवसाच्या अंतराने व हिवाळ्यात 1 आठवड्याच्या अंतराने पाणी द्या. पावसाळ्यामध्ये पिकाची पाण्याची गरज पाहून पाणी द्यावे.

कीड नियंत्रण

1)फुलकिडे आणि मावा इमीडाक्लोप्रिड70WG(अॅडमायर,अॅडफायर) 5gm किंवा इमीडाक्लोप्रिड 17.8SL (मीडीया,कॉनफिडोर) किंवा थायामेथोक्सॅम (मॅक्सिमा,अरेवा,अक्टारा) 10 gm/15 Ltr पाण्यातून 12 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारा.

2)कोळी या किडीमुळे उत्पादनात 35% घट होवू शकते.नियंत्रणासाठी स्पीरोमेसिफेन 22.9SC (ओबेरोन,वोल्टेज) 20ml किंवा प्रोपारगाईट 57EC (ओमाइट,सिंबा) 40ml/15Ltr पाण्यातून फवारा

3)खोड आणि फळे पोखरणा-या अळ्या खोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 40% + सायपर मेथ्रिन 4% (रॉकेट, प्रोफेक्स सूपर) 350ml किंवा प्रोफेनोफॉस 50% EC400ml /200Ltr पाण्यातून प्रती एकर फवारा. किंवा खोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट(प्रोक्लेम EM-1) 5% SG 7gmकिंवा क्लोरॅंट्रॅनीलिप्रोल 18.5%SC (कोरॅजन) 6ml किंवा फ्लूबेनडामाइड 39.9SC (फेम) 5ml किंवा फ्लूबेनडामाइड 20WG(फ्लूटॉन टाकूमी)@10gm/15Ltr पाण्यातून फवारा.

4)पांढरीमाशी पांढ-या माशीमुळे उत्पादनात 40% घट होते व विषाणुजन्य रोगांचा प्रसार होतो.नियंत्रणासाठी अॅसीटामिप्रिड 20SP (धनप्रित, रेकॉर्ड) 5gm किंवाडायफेनथीरॉन 50WP(पेगासास,पोलो) 20gm/15Ltr पाण्यातून फवारा

रोग नियंत्रण

1)भुरी 

भुरी या रोगामध्ये पानांवर पांढरी भुकटी दिसून येते नियंत्रणासाठी गंधक 500gm प्रती एकर 200Ltr पाण्यातून फवारा.

2)रोप मर 

थंड,ढगाळ हवानाम,उच्च आर्द्रता ओली माती व रोपांची गर्दी यामुळे मर रोग येण्याची शक्यता आहे. मर रोगामध्ये पिक पूर्णपणे मरून जाते. मेटालेक्सील 8%+मॅनकोझेब 64%WP (रीडोमीन MZ,कॉरोमील) 2gm/Ltr पाणी याप्रमाणे पेरणीपूर्वी भिजवणी करा. 

3)बोकड्या 

रोग बोकड्या रोग मावाच्या प्रादुर्भावामुळे पसरतो. 25%WG थायामेथोक्सॅम(क्रूसर,अक्टारा) @ 5gm/15 Ltr ची फवारणी करा.

4)करपा टेब्युकोनॅझोल 25ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारा. पानावरील ठिपके क्लोरोथॅलोनील (कवच, जटायु) @ 15gm/10Ltr किंवा प्रॉपिकॉनाझोल 25% EC (रडार, टिल्ट) 10 ml/Ltr ची फवारणी.

इतर समस्या पिवळेपणा पिवळेपणा कमी करण्यासाठी प्रोपिनेब 70WP 35gm+19:19:19 75gm/15 Ltr पाण्यातून फवारा.

सुत्रकृमी

सुत्रकृमी मुळे मुळ्यांची वाढ थांबते व उत्पादनावर परिणाम होतो.सुत्रकृमी नियंत्रणासाठी कार्बोफ्युरान 3G (फ्युराडन,डाइफ्युरान फ्युरी)@10-15kg/एकर प्रदुर्भावाच्या तीव्रतेनुसार वापरा. कापणी आणि काढणी पश्चात तंत्र योग्य अवस्था आणि तंत्र रोप लावणीनंतर 10-12 आठवड्यांनी फळे तयार होतात.फळे पूर्ण टवटवीत आणि चक भचकीत असतानाच काढणी करावी फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घात होते व जुन फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाही. 4-5 दिवसांच्या अंतराने 10-12 वेळा वांग्याचे तोडे करावेत.साधारणपणे 3-3.5 महिने वांग्याची काढणी चालू असते.

- विनोद धोंगडे नैनपुर

 ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

English Summary: Eggplant cultivation technique
Published on: 19 October 2021, 08:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)