Agripedia

महाराष्ट्र राज्यात केवळ १८ टक्के क्षेत्र बागायती खाली असून, उर्वरित ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. राज्यातील ८२ टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. या क्षेत्रातील जमीन ही हलक्या प्रतीची असते. सध्या पावसाची स्थिती चांगली आहे, पण बऱ्याचवेळा पाऊस कमी होत असतो.

Updated on 28 September, 2020 5:06 PM IST

महाराष्ट्र राज्यात केवळ १८ टक्के क्षेत्र बागायती खाली असून, उर्वरित ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे.  राज्यातील ८२ टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. या क्षेत्रातील जमीन ही हलक्या प्रतीची असते. सध्या पावसाची स्थिती चांगली आहे, पण बऱ्याचवेळा पाऊस कमी होत असतो. यामुळे अशा परिस्थितीत तग धरुन राहणारे पीक म्हणजे शेवगा. पण या पीकावरही रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो. याविषयीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. 

१) फुलकिडे :-

  • या किडीची पिले आणि प्रौढ कोवळी पाने आणि शेंगांचा पृष्ठभाग खरवडतात आणि त्यातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर आणि शेंगांवर चट्टे पडतात.
  • शेंगांचा आकार वेडावाकडा होतो.
  • फुलकिडे खरवडलेल्या भागावर बुरशींचा शिरकाव होऊन बुरशीजन्य रोग वाढतात.
  • शेंगांची प्रत खराब होते.

नियंत्रण  :

२) लागवडीच्या वेळी जमिनीमध्ये निंबोळी पेंडीचा वापर करावा.

३) शेतामध्ये प्रति एकरी २० निळे चिकट सापळे लावावेत.

४) फुलकिडे दिसू लागल्याबरोबर करंज तेल १ मि.ली. प्रति लीटर याप्रमाणे फवारावे.  किंवा जैविक कीडनाशक मेटा-हाझीअम अॅनिसोपली पावडर ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारावे.

५) फ्लोनीकॅमीड ५० डब्ल्युजी २ ग्रॅम, बुप्रोफेझीन २५  एससी २० मिली , डायफेन्थुरॉन ५० डब्ल्युपी १२  ग्रॅम, फिप्रोनील ५ एससी ३० मिली किंवा अॅसिफेट ७५  एसपी ८ ग्रॅम. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

लाल कोळी :-

  • शेंड्याकडील पानांवर ही कीड झुपक्याने आढळून येते.
  • अतिशय बारीक आणि लाल रंगाचे हे कोळी कोवळ्या पानांतून रस शोषून घेतात.
  • त्यामुळे पिकांची पाने आकसतात आणि पानाच्या खालच्या बाजूस तांबूस रंग येतो.
  • शेंगांची प्रत खराब होने.

नियंत्रण :-

१) प्रादुर्भाव दिसू लागल्याबरोबर करंज तेल १ मिली निंबोळी तेल २ मि.ली. प्रति लीटर या प्रमाणात फवारावे.

२) जैविक कीडनाशकामध्ये व्हर्टीसिलीअम लेकॅनी ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यात फवारावे.

३) डायकोफॉल १८.५ टक्के ५४ मिली , फोसॅलोन ३५ ईसी ३४ मिली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

 

 खोड आणि फांद्या पोखरणारी अळी:-

  • अळी झाडाचे खोड पोखरून आत शिरते.
  • झाड कमकुवत होते आणि खोडावर छिद्रे दिसतात.
  • छिद्राभोवती अळीची भुसामिश्रीत विष्ठा दिसून येते.
  • उत्पादनात घट येते.

नियंत्रण :-

  • पेट्रोलमध्ये बुडविलेला कापसाचा बोळा अळीने पाडलेल्या छिद्रात टाकावा किंवा डायक्लोरोव्हॉस हे कीटकनाशक अळीच्या छिद्रात टाकावे आणि छिद्र चिखलाने बंद करावे.

 


पाने गुंडाळणारी अळी :-

या किडीची अळी शेवग्याची पाने व फुले यांचे नुकसान करते.

  • पानांची आणि फुलांची मोठ्या प्रमाणात गळ होते.
  • अळी शेंगाचे देखील नुकसान करते.
  • नियंत्रण :-
  • या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • अधून-मधून अळीने गुंडाळलेली पाने एकत्र गोळा करून नष्ट करावी.

लेखक -

श्री. आशिष वि. बिसेन

(वरिष्ठ संशोधन साहाय्यक, कीटकशास्त्र विभाग)

 भा.कृ.अनु.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

 इ.मेल. ashishbisen96@gmail.com

 

English Summary: Effective pest management on drum stick crop
Published on: 28 September 2020, 05:05 IST