भारतात खाद्य तेल टंचाई भासत आहे परदेशातुन तेल आयात करावे लागते बरेच कोटी पैसे खर्च करावे लागतात
शेतकरी सोयाबीन तेल पिका कडे वळले आहेत त्यात त्यांना चांगला भाव मिळत आहे आतां रबी, ऊन्हाळी सोयाबीन पेरत आहे त्यात बिजोऊत्पादन करुन बियाणे उपलब्ध होईल.
महाराष्ट्रात तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल या पिकाचा जवळजवळ ७0 टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून सूर्यफुलास प्राधान्य दिले जाते.
वर्षभर तीनही हंगामात घेतल्या जाणा-या या तेलबिया पिकाची खरिपात १५ जून ते १५ जुलै दरम्यान पेरणीची शिफारस असली तरी पाऊसमान उशिरा सुरू झाल्यास किंवा खरीप पिकाची दुबार पेरणी झाल्यास सूर्यफूल पीक घेण्याचा विचार केल्यास पीक वाया जाण्याचा किंवा कमी उत्पादन मिळण्याचा धोका टळतो. दिवसेंदिवस या पिकाखालील क्षेत्रात होणारी घट ही एक चिंतेची बाब आहे.
जगात सोयाबीन खालोखाल सूर्यफूल हे एक महत्वाचे खाद्यतेल आहे. सूर्यफूलाची उत्पादकता ६oo कि.ग्रॅ./हे. म्हणजे जागतिक सरासरी उत्पादकतेच्या (१२०० कि.ग्रॅ./हे.) निम्मी आहे. सूर्यफुलाची लागवड वाढविण्याबरोबरच उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे.
सूर्यफूलाची उत्पादकता वाढविण्यासाठी पूर्वमशागत, योग्य जमिनीची निवड, सूर्यफूलाच्या सुधारित व संकरित जातीचा वापर, वेळेवर पेरणी, प्रतिहेक्टरी बियाणे वापर, पेरणी अंतर, संतुलित खते, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड व रोग व्यवस्थापन त्याचबरोबरीने परागीभवन वाढविण्यासाठी योग्य ते नियोजन, पक्षांपासून संरक्षण तसेच वेळेवर काढणी इ. गोष्टींचा सुयोग्य विचार होणे आवश्यक आहे.
दुसरे तेल पिक सुर्यफूल खरीप हंगामात अळी चा प्रादुर्भाव जास्त होतो म्हणुन शेतकरी रबी, ऊन्हाळी हंगामात सुर्यफूला पसंती देत आहे पण सध्या बियाणे च मिळत नाही ईच्छा असुन पेरता येते नाही बियाणे टंचाई वर शासनाने मार्ग काढावा
कृषि विद्यापिठे खाजगी कंपन्या ह्यांना कार्यक्रम देऊन बिजोऊत्पादन करुन घ्यावे शेतकरी सोयाबीन सारखे संकरीत बिजोऊत्पादन करु शकत नाही
बियाणे मिळाले तर शेतकरी रबी हंगामात सुर्य फुल पेरु शकतील
त्या करीता लोकप्रतिनिधी ह्यांनी पुढाकार घ्यावा
ह्याचे प्रभोधन होणे आवश्यक आहे म्हणजे तेल टंचाई वर मात करता येईल व शेतकर्याना भाव मिळेल तेल आयात कमी झाल्याने देशाचा पैसा ही वाचेल
विलास काळकर जळगांव
सेवा निवृत्त कृषि अधिकारी मो न
9822840646
Published on: 27 January 2022, 05:33 IST