कमीत कमी गुंतवणुकीतून चांगला नफा सगळेजण कमवू इच्छितात. यासाठी शेतकरी देखील वेगवेगळ्या पद्धतीची शेती करणे पसंत करतात. या कामामध्ये महिलांनी देखील सहभाग नोंदविला तर नशीब पालटायला वेळ लागणार नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे झारखंड येथील महिलांनी हे सिद्ध करून दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे.
झारखंड मध्ये जमिनीची उपलब्धता असल्याने लेमन ग्रासच्याशेतीसाठी चांगले भविष्य आहे. लेमन ग्रास चा शेतीसाठी कमी पाण्याची आवश्यकता असते. लेमन ग्रास च्या शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकार सोबत बऱ्याच प्रकारच्या संस्था देखील काम करीत आहेत.लेमन ग्रास च्या शेतीच्या माध्यमातून झारखंड मधील बोकारो जिल्ह्यातील विविध गावांमधीलमहिलांच्या जीवनात कायापलट झाला आहे. 28 एकर पडीत जमिनीवर जवळजवळ 140 महिला शेतकरी लेमन ग्रासचीशेती करीत आहेत. या शेतीच्या माध्यमातून जवळजवळ साडेतीन लाख रुपयांची कमाई करून त्या महिलांनी त्यांच्या जीवनात कायापालट केला आहे.
लेमन ग्रास ची शेती केव्हा करावी?
लेमन ग्रास ची शेती करण्यासाठी चा चांगलीवेळही फेब्रुवारी ते जुलै च्या दरम्यान चा काळ आहे. लेमन ग्रास ची एकदा लागवड केल्यानंतर तुम्ही सहा ते सात वेळा याची कापणी करू शकतात.लागवडीनंतर तीन ते पाच महिन्यांनी पहिली कापणी करता येते.
लेमन ग्रास हे बारमाही पीक आहे..
लेमन ग्रास शेतीच्या माध्यमातून एका वर्षात एक लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत कमाई करता येऊ शकते.खर्च वजा जाता एका वर्षात 70 हजार ते 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. लेमन ग्रास चा उपयोग तेल काढण्यासाठी देखील केला जातो. तुम्ही तरी जमिनीचे एखाद्या छोट्या तुकड्यात लेमनग्रास ची लागवड केली तरी तुम्हाला जवळजवळ तीन ते पाच लिटर यापासून तेल मिळू शकते. या पासून तयार होणाऱ्या एका लिटर त्यांची किंमत जवळजवळ एक हजार रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत आहे.
किड व रोग नियंत्रण
लेमन ग्रास मध्ये खोडकीड एचडी चा प्रादुर्भाव जास्त असतो. ही कीड रूपाच्या तळाशी क्षेत्र करून पूर्ण लेमन ग्रासचेपूर्ण रोपखराब करते. याचे प्रमुख लक्षण म्हणजे पानांमधील मधला भाग वाळतो.
लेमन ग्रास पासून बनतात विविध उत्पादने
या वनस्पतीचा सगळ्यात जास्त उपयोग हवा परफ्युम, साबण, हेअर ऑइल, लोशन आणि कॉस्मेटिक बनवण्यासाठी केला जातो. बऱ्याच वस्तूंच्या माध्यमातून लेमन ग्रास हा सुवासिक वास येतो. कारण या वस्तू लेमनग्रास पासून मिळालेल्या केल्या पासून बनवल्या जातात. लेमन ग्रास चा उपयोग हा लेमन टी बनवण्यासाठी देखील केला जातो. याशिवाय विविध प्रकारच्या उपयोगात देखील लेमन ग्रास आणली जाते.
Published on: 20 December 2021, 10:28 IST