Agripedia

अमरेली जिल्हा ऊस उत्पादक जिल्हा नाही. मात्र हरेशभाई देगडा गेल्या वर्षभरापासून ऊसाची यशस्वी शेती करत आहेत. हा ऊस तयार व्हायला 11 महिन्यांचा कालावधी लागतो. मागील वर्षी ऊसाच्या पिकातून त्यांना 16 लाख रुपयांची कपॉलिहाऊसमध्ये गुलाबाची लागवड करा आणि कमवा जास्तीचे पैसे कमाई झाली.

Updated on 10 April, 2024 12:58 PM IST

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात सर्वसामान्यपणे ऊसाचे उत्पादन घेतले जात नाही. असे असताना सावरकुंडला तालुक्यातल्या एका शेतकऱ्याने काळ्या ऊसाच्या उत्पादनातून लाखो रुपये कमवून सर्वांना आश्चर्यचकित केले. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा सुरू आहे.

येथील जेजाद गावात हरेशभाई देगडा यांनी काळ्या ऊसाचे पिक घेतले आहे. 45 वर्षांच्या हरेशभाई त्यांच्या गेल्या अनेक पिढ्या याच व्यवसायात आहेत. मात्र आता हरेशभाईंनी जैविक शेतीचा पर्याय निवडला आहे.

अमरेली जिल्हा ऊस उत्पादक जिल्हा नाही. मात्र हरेशभाई देगडा गेल्या वर्षभरापासून ऊसाची यशस्वी शेती करत आहेत. हा ऊस तयार व्हायला 11 महिन्यांचा कालावधी लागतो. मागील वर्षी ऊसाच्या पिकातून त्यांना 16 लाख रुपयांची कपॉलिहाऊसमध्ये गुलाबाची लागवड करा आणि कमवा जास्तीचे पैसे कमाई झाली.

त्यांना 20 किलो ऊसाच्या पिकाला 250 ते 350 रुपये भाव मिळाला होता. त्यांनी काळ्या ऊसाची पहिल्यांदाच लागवड केली होती. यंदा त्यांनी 3 हेक्टरवर ऊसाची लागवड केली आहे. त्यातून त्यांना 32 लाख रुपयांचे ऊसाचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

दरम्यान, या ऊसाचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. साखर किंवा गूळ तयार करण्यासाठी हा ऊस वापरला जात नाही. या ऊसामध्ये कोल्हापुरी काळा, मद्रासी काळा आणि सफेद जामनगरी ऊसाला समाविष्ट करण्यात आले आहे.

English Summary: Earn lakhs of rupees by growing black sugarcane Learn the technicalities
Published on: 10 April 2024, 12:58 IST