Agripedia

कोथिंबीर ज्या प्रमाणे भोजनाची स्वाद वाढवते तशीच ती शेतकरी राजांचे उत्पादन देखील वाढवू शकते. कोथिंबीर (Coriander) शिवाय जवळपास कुठलीच भाजी भारतीय स्वयंपाकघरात तयार होत नाही, बहुधा सर्वच लोक आपल्या जेवणात कोथिंबीरचा उपयोग करतात. कोथिंबीर ही सलाद मध्ये तशीच कच्ची देखील खाल्ली जाते, तसेच उपहारगृहात भाजी गार्निश (सजवण्यासाठी) करण्यासाठी वापरतात. कोथिंबीरला खुप मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध आहे, ह्याची मागणी ही वर्षभर बनलेली असते.

Updated on 04 October, 2021 9:58 AM IST

कोथिंबीर ज्या प्रमाणे भोजनाची स्वाद वाढवते तशीच ती शेतकरी राजांचे उत्पादन देखील वाढवू शकते. कोथिंबीर (Coriander) शिवाय जवळपास कुठलीच भाजी भारतीय स्वयंपाकघरात तयार होत नाही, बहुधा सर्वच लोक आपल्या जेवणात कोथिंबीरचा उपयोग करतात. कोथिंबीर ही सलाद मध्ये तशीच कच्ची देखील खाल्ली जाते, तसेच उपहारगृहात भाजी गार्निश (सजवण्यासाठी) करण्यासाठी वापरतात. कोथिंबीरला खुप मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध आहे, ह्याची मागणी ही वर्षभर बनलेली असते.

त्यामुळे कोथिंबीर लागवड (Coriander Farming) करून शेतकरी (Farmer) चांगले बम्पर उत्पादन घेऊ शकतात आणि चांगली बक्कळ कमाई करू शकतात. म्हणुन आज आम्ही आपणासाठी आगात कोथिंबीर लागवडीची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणुन घेऊ आगात कोथिंबीर लागवडिविषयी…..

 आगात कोथिंबीर लागवडीसाठी काही टिप्स

अनेक कृषि वैज्ञानिक (Agricultural Scientist) सांगतात की,

  • कोथिंबीरची लागवड ही कोरड्या आणि थंड हवामानात केली पाहिजे ज्यामुळे कोथिंबीर लागवडीतून शेतकरी बांधव चांगले उत्पादन घेऊ शकतात.
  • शेतकरी मित्रांनो (Farmer) लक्षात ठेवा, कोथिंबिरच्या पिकाला दंवमुक्त/दडमुक्त हवामान आवश्यक असते.

तसेच कोथिंबीरचे उत्पादन हे सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते. त्यामुळे कोथिंबीर लागवड (Coriander Cultivation) ही शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवुन देणारे पिक आहे.

  • शेतकरी मित्रांनो जर तुमचे वावर हे हलके असेल तर सेंद्रिय/जैविक खताचा जास्तीचा वापर करून कोथिंबीरचे पिक घेतले जाऊ शकते.
  • कोथिंबीरची पेरणी ही अशा जमीनीत करावी ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होतो त्यामुळे कोथिंबीरचे उत्पादन वाढेल.
  • कोथिंबीर पिकासाठी लोममाती उत्तम मानली जाते, मात्र जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी.
  • नांगरणीच्या वेळी वावरात 15 ते 20 क्विंटल जुने कुजलेले शेणखत टाकावे. त्यामुळे कोथिंबीर चांगली वाढते.
  • कोथिंबिरीचे अनेक जाती (Species Of Coriander) बाजारात उपलब्ध आहेत. शेतकरी बांधवानो त्यापैकी कुठलेही सुधारित वाण निवडून कोथिंबीर पेरू शकतात. कोथिंबीर लागवड करण्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा सर्वोत्तम काळ असतो असे सांगितलं जाते.
  • कोथिंबीर पेरल्यानंतर पहिले पाणी साधारण 30 ते 35 दिवसांनी द्यावे. जेव्हा कोथिंबीरचे पाने बनायला, तयार होयाला सुरवात होते तेव्हा म्हणजे साधारण 50 ते 60 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.
  • जर आपण धनेसाठी लागवड करत असाल तर, जेव्हा फांद्या बाहेर येऊ लागतात,फुले येऊ लागतात तेव्हा तिसऱ्यांदा 70 ते 80 दिवसांनी पाणी भरणा करा. धने येऊ लागले की म्हणजे 90 ते 100 दिवसांनी चौथे पाणी फिरवावे. ह्यानंतर अजून एकदा शेवटचे पाणी फिरवायला हवे.
English Summary: early coriender cultivation give more benifit to farmer
Published on: 04 October 2021, 09:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)