Agripedia

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स सुरु केले गेले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या पद्धती,

Updated on 15 February, 2022 5:10 PM IST

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स सुरु केले गेले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या पद्धती, तंत्रज्ञान आणि योजनांविषयी माहिती पुरवली जात असते. सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनाही हे अ‍ॅप्स वापरणे सोपे आहे. अशीच काही महत्वपूर्ण अ‍ॅपची माहिती आज पाहूयात.

किसान सुविधा अ‍ॅप : या अ‍ॅपवर तुम्हाला शेतीसंबंधीच्या माहितीसोबतच इतर बरीच माहिती मिळते आहे. या अ‍ॅपवर पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज तुम्ही पाहू शकता. 

तसेच पिकांचा बाजारभाव, शेतीविषयक सल्ले, पीक संरक्षण आदी गोष्टींविषयीही देखील माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन आणि बाजारात पीक कधी विकायचे? याचा अंदाज येतो. याशिवाय, या अ‍ॅपवर कृषी तज्ज्ञ आणि जाणकरांकडून सल्लेही दिले जात असतात.

केळ्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे अ‍ॅप : हे अ‍ॅप भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि राष्ट्रीय केळी अनुसंधान केंद्राकडून केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चालविले जाते. 

या अ‍ॅपचे नाव बनाना प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी असे असून हे अ‍ॅप सध्या हिंदी, इंग्रजी आणि तामिळ भाषेत काम करते. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, माती, केळीची रोपे, त्यांना पाणी कसे द्यायचे? आदी बाबींची सविस्तर माहिती दिली जाते.

मेघदूत मोबाईल अ‍ॅप : या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत शेतीविषयीची माहिती मिळते. 

यामध्ये हवामान, पिकं आणि पशुपालनाच्या समस्यांवर मार्गदर्शन केले जाते.

हे अ‍ॅप भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटीबंधीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय कृषी समिती यांच्याकडून संयुक्तपणे चालविले जाते.

या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या पद्धती, तंत्रज्ञान आणि योजनांविषयी माहिती पुरवली जात असते. सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनाही हे अ‍ॅप्स वापरणे सोपे आहे. अशीच काही महत्वपूर्ण अ‍ॅपची माहिती

English Summary: Each farmers to this amazing app need
Published on: 15 February 2022, 05:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)