Agripedia

अलीकडे भारतात पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन शेतकरी नगदी पिकांची शेती करत आहेत, आणि ही काळाची गरज देखील बनली आहे. पारंपरिक पीक पद्धतीतून हवे तेवढे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही याउलट नगदी पिकातून दर्जेदार उत्पादन मिळते, शिवाय नगदी पिकांना बाजार भाव हा इतर पिकांच्या तुलनेत अधिक असतो, त्यामुळे नगदी पिकांची लागवड शेतकऱ्यांना मालामाल बनवत आहे. अशाच एका नगदी पिकांपैकी एक आहे शेवग्याचे पीक. शेवग्याचे पीक शेतकऱ्यांसाठी तर फायदेशीर आहेच शिवाय यात असलेले आयुर्वेदिक गुण याला विशेष महत्त्व प्रदान करून देते. शेवगा खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात, त्यामुळे डॉक्टर देखील शेवग्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. शेवगा एक प्रमुख भाजीपाला पीक आहे आणि याची मागणी खेड्यापासून तर शहरी भागापर्यंत सर्वत्र बघायला मिळते. म्हणून आज खुशी जागरण आपल्या वाचक मित्रांसाठी शेवग्याच्या लागवडीविषयी महत्वपूर्ण माहिती घेऊन आले आहे, चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया शेवगा लागवडी विषयी सर्वकाही.

Updated on 21 December, 2021 8:44 PM IST

शेवग्याची शेती करणे हे तुलनेने फारच सोपे आहे, शेतकरी बांधव यांची शेती फक्त 50 हजार रुपये भांडवल लावून सुरू करू शकता, आणि शेवगा पिकातून वर्षाकाठी सहा लाख रुपये कमवू शकता. शेवग्याला इंग्रजीत ड्रमस्टिक म्हणून संबोधले जाते, हिंदीत त्याला सहजन म्हणून ओळखले जाते, तर त्याचे वैज्ञानिक नाव मोरिंगा ओलीफेरा असे आहे. शेवग्याची लागवड जवळपास संपूर्ण जगभर केली जाते. श्रीलंकेत तसेच फिलिपिन्समध्ये शेवगा लागवड ही खुप लक्षणीय बघायला मिळते. या पिकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची लागवड पडीत पडलेल्या जमिनीत सुद्धा केली जाऊ शकते.

अशी करा सुरुवात

शेवगा ही एक औषधी वनस्पती आहे, तसेच हे प्रमुख भाजीपाला पीक देखील आहे म्हणून याची मागणी कायम बनलेली असते. शेवगा लागवड कमी खर्चात केली जाऊ शकते. शेवगा हे एक बहुवार्षिक पीक आहे, याची एकदा लागवड केली की चार वर्षापर्यंत उत्पादन घेतले जाऊ शकते. शेवगा पिकाचे वर्षातून दोनदा उत्पादन घेतले जाते. एका वर्षात शेवग्याच्या एका झाडापासून कमीत कमी दोनशे ते चारशे शेंगा म्हणजे जवळपास 50 किलोग्राम शेवगा मिळतो. शेवगा पिकाची काढणी आणि जवळपास दोन महिन्यापर्यंत चालू शकते. शेवग्याच्या शेंगाला रेषा पडण्याआधी त्याची काढणी करणे गरजेचे ठरते नाहीतर त्याला चांगला बाजारभाव मिळत नाही.

किती होणार कमाई

एका हेक्‍टरमध्ये जवळपास सत्ताविसशे शेवग्याची रोपे लावली जाऊ शकतात. एका एकरमध्ये शेवगा लागवड करण्यासाठी जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च येतो म्हणजे हेक्टरी सव्वा लाख रुपये खर्च शेवगा लागवड करण्यास येतो. शेवगा पिकातून हेक्टरी सव्वा दोन लाख रुपये कमाई होऊ शकते, म्हणजे आपणास हेक्‍टरी एक लाख रुपये निव्वळ नफा राहू शकतो.

English Summary: drumstick cultivation is profitable for farmers
Published on: 21 December 2021, 08:44 IST