डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सहकार्याने ग्रामीण युवकांमध्ये उद्योजकता विकासासाठी कौशल्य अभिमुखता अभियानातंर्गत कृषी उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे सदर उपक्रम पालक मंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून आणि कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे
जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील ग्रामीण युवक-युवतींना अधिक उद्यमशील बनविण्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आगळावेगळा उपक्रम राबवण्याची जबाबदारी प्रकल्पाचे समन्वयक डॉ. किशोर बिडवे यांच्याकडे आहे. शेती आधारित पूरक उद्योग ज्यामध्ये व्यावसायिक दूध व दुग्ध पदार्थ निर्मिती, व्यावसायिक शेळी पालन तंत्रज्ञान, व्यावसायिक कोंबडीपालन तंत्रज्ञान, व्यावसायिक फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान, शेतीमाल प्रक्रिया तंत्रज्ञान, व्यावसायाभिमुख सेंद्रिय शेती निविष्ठानिर्मिती, व्यावसायाभिमुख भाजीपाला उत्पादन आदी विषयांवर कृतियुक्त प्रशिक्षणाचे नियोजन विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे. यात प्रत्येकी ७५ प्रशिक्षणार्थी राहतील,
अशा एकूण असणाऱ्या एकूण ३५ बॅचेसद्वारे जिल्ह्यातील तब्बल २७०० युवक-युवतींना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे.
शाश्वत ग्रामविकासासाठी गाव पातळीवर उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून कच्च्या मालापासून पक्क्या मालाची गावपातळीवरच मुदत चे निर्मिती करणे महत्त्वाचे आहे. कौशल्य प्राप्तीद्वारे कुटीर उद्योगांचे जाळे गावोगावी ग्राहक उभारणे हा शाश्वत ग्रामविकासासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. शहरातील पैसा गावात होण्य चे येत स्थानिकांचे शहराकडील स्थलांतरसुद्धा थांबवता येईल.
ही या योजनेमागील मूळ टक्के डे संकल्पना आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील ग्रामीण युवक-युवतींना अधिक उद्यमशील बनविण्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आगळावेगळा उपक्रम राबवण्याची जबाबदारी प्रकल्पाचे समन्वयक डॉ. किशोर बिडवे यांच्याकडे आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन समितीच्या मुख प्ये माध्यमातून हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास आहे. असे मत डॉ. विलास भाले, कुलगुरू, पंदेकृवि, अकोला यांनी मांडले आहे.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 05 February 2022, 12:11 IST