Agripedia

या संदर्भात, इफको शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शेतात जाऊन ड्रोन तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक दाखवते, जेणेकरून शेतकऱ्यांना जमिनीच्या पातळीवर नॅनो युरियाचा वापर शिकता येईल. अशा परिस्थितीत, इफकोने नुकतेच उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये थेट फील्ड परफॉर्मन्स आयोजित केला होता.

Updated on 27 March, 2022 5:43 PM IST

अलीकडच्या काळात शेतीत मोठे बदल होत चालले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शारीरिक कष्टाचे काम आता कमी करावे लागत आहे. तसेच उत्पन्न देखील यामुळे वाढत आहे. एकीकडे रोज 1 लाखांहून अधिक नॅनो युरियाचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे, अनेक शेतकरी अजूनही नॅनो युरिया वापरण्यास घाबरत आहेत. या संदर्भात, इफको शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शेतात जाऊन ड्रोन तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक दाखवते, जेणेकरून शेतकऱ्यांना जमिनीच्या पातळीवर नॅनो युरियाचा वापर शिकता येईल.

अशा परिस्थितीत, इफकोने नुकतेच उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये थेट फील्ड परफॉर्मन्स आयोजित केला होता. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाने खते व कीटकनाशकांची फवारणी कशी करावी हे सांगितले. या भागात त्रिवेणी अभियांत्रिकी आणि उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने लिसोडा गावात ड्रोनच्या सहाय्याने उसाच्या पिकावर कीटकनाशक रसायनांच्या फवारणीचा लाईव्ह डेमो देण्यात आला.

गुडगावच्या अॅग्रीबोट ड्रोन अल्थारा ग्लोबल कंपनीने उपस्थित शेतकरी, मिल आणि ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हा डेमो दिला. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रोन फवारणीसाठी शेतकऱ्यांना एकरी १०० रुपये खर्च येतो आणि इतर मजुरांची गरज नसते. म्हणजेच ड्रोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकीकडे फवारणीसाठी लागणारे श्रम वाचले. दुसरीकडे, वापरासाठी आवश्यक कीटकनाशके देखील वाचतात.

आजपर्यंत ऊस मोठा झाला की त्याच्यावर औषधे मारता येत नव्हती, आता मात्र ड्रोनमुळे हे शक्य होत आहे. उभ्या ऊस पिकावरही ड्रोन फवारणी सहज करता येते. पारंपारिकपणे हे नॅपसॅक स्प्रेअर किंवा ट्रॅक्टर ड्रायव्हन स्प्रेअरने सहज शक्य नाही. फक्त 500 मिली नॅनो युरिया हे एक बॅग युरियाएवढे असते. यामुळे येणाऱ्या काळात हे फायदेशीर ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
भावा फक्त तूच रे!! परदेशातील नोकरीला लाथ मारून करतोय शेती, आज लाखोंची उलाढाल
मोठी बातमी! ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय, कर्जमाफीबाबाबत आता शेतकऱ्यांचे टेन्शनच मिटले..
...म्हणून मला त्या फाइलवर सही करावी लागली!! आणि शेतीत बदल घडवायचा असे मी मनाशी पक्के ठरवले

English Summary: Drone Spraying of Fertilizers and Pesticides and Sugarcane Crop 2 Beneficial, Reed Complete Information
Published on: 27 March 2022, 05:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)