Agripedia

सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के

Updated on 24 January, 2022 1:32 PM IST

80 % ठिबक अनुदान देण्याचा निर्णय जाहीर, या शेतकऱ्यांच्या हातात खालील प्रमाणे अनुदा पडणार.

सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के) कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते.

 शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने 

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ऊस, केळी, हळद पिकास ठिबक सिंचनाचा व सोयाबीन, हरभरा पिकास तुषार सिंचनाचा वापर करून मोठया प्रमाणात क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी योजनेचा लाभ मिळावा.

भुधारक शेतकऱ्यांना 80 टक्के व इतर शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान –

सन 2021-22 मध्ये केंद्र शासनाने खर्चाच्या मापदंडामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे अनुदानाच्या रक्कमेतही वाढ झाली आहे. सन 2021-22 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना देय 

55 टक्के अनुदानास पुरक अनुदान 25 टक्के व इतर शेतकऱ्यांना (5 हेक्टरच्या मर्यादेत) देय 45 टक्के अनुदानास पुरक अनुदान 30 टक्के देय आहे. याप्रमाणे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना 80 टक्के व इतर शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान मिळणार आहे.

 

𝐄-शेतकरी अपडेट्स

English Summary: Drip irrigation subsidy announced 80%
Published on: 24 January 2022, 01:32 IST