Agripedia

रविकांत तुपकरांच्या प्रयत्नांना मिळाले यश. सोमठाणा,दिवठाणा,शेलोडीसाठी नविन रोहित्र कामास मंजुरात

Updated on 04 March, 2022 11:12 PM IST

रविकांत तुपकरांच्या प्रयत्नांना मिळाले यश. सोमठाणा,दिवठाणा,शेलोडीसाठी नविन रोहित्र कामास मंजुरात

चिखली तालुक्यातील सोमठाणा,दिवठाणा,या गावासाठी सुरळीत विज पुरवठा होत नसल्याने व लाईन सप्लाय कमी मिळत असल्याने या गावामधे अतिरीक्त रोहित्र देण्यात यावे,त्याचप्रमाणे शेलोडी येथील घाडगे नवाने असलेले रोहित्र ओव्हरलोड असल्याने या ठिकाणी अतिरीक्त रोहित्र देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडुन स्वाभिमानी चे नेते रविकांत तुपकर यांच्याकडे करण्यात आली होती.दरम्याण तुपकरांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे या कामासाठी उपाययोजना करुण कामास मंजुरात देण्याची मागणी काहि महिण्यापुर्वी केली होती.

तर या गावातील नविन रोहित्र कामास मंजुरात मिळाली असुन सोमठाणा शेतीपंपासाठी१गावठाण १दिवठाणा गावठाण१शेलोडी शेतीपंपासाठी१असे चार नविन रोहित्रास मंजुरात मिळाली असल्याने या गावातील व शेतीपंप विजेचा प्रश्न रविकांत तुपकरांच्या प्रयत्नामुळे कायमस्वरुपी निकाली निघाला आहे.

मौजे सोमठाणा येथील शेतीपंपाचे रोहित्र सातत्याने जळत असल्याने व सोमठाणा व दिवठाणा गावामधे लाईट कमी मिळत असल्याने व सुरळीत पणे विज पुरवठा होत नसल्याने व कमी विज प्रवाहामुळे उपकरणे जळत असल्याने 

यावर कायम स्वरुपी उपाययोजना व्हाव्यात व नविन रोहित्र मंजुर करण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानी चे नेते रविकांत तुपकर व तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री माळोदे यांच्याकडे स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी ग्रामस्थ व शेतकरी यांच्या समवेत केली होती.दरम्याण तुपकरांच्या मागणी नंतर कार्यकारी अभियंता बुलढाणा यांनी सोमठाणा गावातील रोहित्र व विजेच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिने शेताच्या बांधावर व गावामधे जात पाहणी केली होती.तर सातत्याने जळत असलेले रोहित्र बदलुन देऊन त्या ठिकाणी सप्लाय वेगवेगळा करण्यासाठी नविन पोल व गावातील मोडकळीस आलेले पोल नविन टाकण्याच्या सुचना संबंधीत सहाय्यक अभियंता यांना दिल्या होत्या दरम्याण त्यावेळी तातडीने गावातील व शेतातील पोल बदलण्यात आले होते.तर हा प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघावा यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत सोमठाणा गावठाण१ शेतीपंपासाठी१ दिवठाणा गावठाण१,

त्याचप्रमाणे शेलोडी येथे घाडगे नावाने असलेले १००के व्ही असे अतिरीक्त रोहित्र देण्यात यावे,अशी मागणी रविकांत तूपकरांकडे केली होती.तर महावितरणकडे निधी नसल्याने याबाबत तुपकरांनी तातडीने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे जिल्हा वार्षीक योजने अंतर्गत निधी देण्यात यावा,अशी मागणी केली होती.दरम्याण या गावातील अतिरीक्त रोहित्र कामांसाठी एकुन अंदाजे 20लाखाची मंजुरात देण्यात आली असुन स्वाभिमानीने केलेल्या पाठपुराव्यामुळे या गावातील नागरीकांना शेतकर्याना दिलासा मिळाला असुन नियमीत भेडसवणारी समस्या कायमस्वरुपी निकाली निघाली आहे.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Dr. Rajendra Shingne give the found this villages for electricity work
Published on: 04 March 2022, 11:12 IST