Agripedia

सध्याच्या परिस्थितीमध्ये जेथे पावसाची शक्यता दिसते तेथे पाऊस झाल्यानंतर डाऊनी मिल्ड्यू

Updated on 08 March, 2022 7:46 PM IST

रोग नियंत्रणाचे उपाय

सध्याच्या परिस्थितीमध्ये जेथे पावसाची शक्यता दिसते तेथे पाऊस झाल्यानंतर डाऊनी मिल्ड्यू किंवा करपा किंवा तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशकाची (अर्धा टक्का बोर्डो मिश्रण किंवा कॉपर हायड्रॉक्साईड दीड ते दोन ग्रॅम किंवा कॉपर आॅक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी उपयोगी पडते.

ढगाळ वातावरणात रिमझिम पाऊस झाल्यास भुरी वाढू शकतो.

नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्लूजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या भागात फक्त सल्फरचा वापर झालेला आहे आणि ताम्रयुक्त बुरशीनाशके किंवा ट्राय अझोल गटातील बुरशीनाशकांचा वापर झालेला नाही, अशा बागेमध्ये जैविक नियंत्रणाचा वापर करणे शक्य आहे. रिमझिम पाऊस झाल्यानंतर भुरीच्या नियंत्रणासाठी ॲम्पिलोमायसीस ५ मि.लि किंवा ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हलक्या पावसामुळे सर्वसाधारणपणे नवीन फुटी लवकर वाढतात. या फुटींचा लवकर खुडा केल्यास बागेमध्ये करपा, 

तांबेरा वाढत नाही म्हणून बुरशीनाशकाच्या फवारणीएेवजी खुडा करण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.

कीड नियंत्रणाचे उपाय :-

पावसाने झालेल्या जास्त आर्द्रतेचा फायदा घेऊन रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी ३ ते ५ मि.लि मेटारायझियम किंवा ३ ते ५ मि.लि बिव्हेरिया प्रतिलिटर पाणी आणि लाल कोळीच्या नियंत्रणासाठी ३ ते ५ मि.लि हिरसुटीला थाॅंपसनी प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास चांगले नियंत्रण मिळून फायदा होण्याची शक्यता आहे.

ढगाळ वातावरणात रिमझिम पाऊस झाल्यास भुरी वाढू शकतो. नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्लूजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या भागात फक्त सल्फरचा वापर झालेला आहे आणि ताम्रयुक्त बुरशीनाशके किंवा ट्राय अझोल गटातील बुरशीनाशकांचा वापर झालेला नाही, अशा बागेमध्ये जैविक नियंत्रणाचा वापर करणे शक्य आहे. रिमझिम पाऊस झाल्यानंतर भुरीच्या नियंत्रणासाठी ॲम्पिलोमायसीस ५ मि.लि किंवा ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

English Summary: Downy Mildew, note the outbreak of taxa
Published on: 08 March 2022, 07:46 IST